"मराठीतील कोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १७:
[[श्रीधर व्यंकटेश केतकर]] यांनी तयार केलेला 'ज्ञानकोश' ही मराठी कोशवाङ्मयातील अत्यंत महत्त्वाची, ऐतिहासिक स्वरूपाची अद्वितीय कामगिरी आहे. ज्ञानकोश याचा अर्थ सर्व विद्याशाखांतील माहितीचा पद्धतशीरपणाने केलेला संग्रह. तो इथे नेमकेपणी पाहायला मिळतो. मराठीतील ज्ञानकोशांची संख्या आता शंभरच्या घरात गेली आहे. तीत मुलांचे ज्ञानकोश, सर्वसंग्राहक कोश, विषयज्ञानकोश अशी भरपूर विविधता आहे. हा ज्ञानकोश आंतरजालावर मोफ्त वाचता येतो.
 
स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली 'मराठी विश्वकोशा'ची निर्मिती सुरू केली. 'विश्वकोश' हा मराठी माणसाला जागतिक पातळीवरचे ज्ञान आत्मसात करायला मदत करणारा ज्ञानकोश आहे. माणसाच्या व्यक्तिमत्त्वविकासाशी, त्याच्या प्रगल्भतेशी साहित्याचा व संस्कृतीचा संबंध असतो याचे भान राखून विश्वकोशाची निर्मिती झाली आहे. १९७६मध्ये विश्वकोशाचा पहिला खंड प्रसिद्ध झाला. इ.स.२०१६मध्ये विसावा खंड पूर्ण होऊन विश्वकोशाची मूळ योजना मार्गी लागेल. हाही ज्ञानकोश आंतरजालावर पहाता येतो, आणि तो सीडीरूपातही विकत मिळतो.
 
==संस्कृतिकोश==
महादेवशास्त्री जोशी यांनी १९६२ ते १९७९या काळात दहा खंडांचा 'भारतीय संस्कृतिकोश' ही महत्त्वाची कोशनिर्मिती केली.. संस्कृतीचे विविध घटक लक्षात घेऊन केलेल्या सुमारे बारा हजार नोंदी या कोशात आहेत. या कोशाप्रमाणेच दोन हजार पृष्ठांचा, चार खंडांतील मुलांचा संस्कृतिकोशही महादेवशास्त्रींनी निर्माण केला.