"रघुनाथ धोंडो कर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ७४:
* संतति नियमन - विचार व आचार, इत्यादी.
 
===र.धों. कर्वे यांनी लिहिलेली काही अप्रकाशित पय्रेपत्रे===
र.धों. कर्वे यांनी कुणा अनामिक व्यक्तीला २८ पत्रे लिहिली होती, त्यांतली २४ पत्रे २०१६ सालच्या एप्रिलमध्ये सापडली. त्या पत्रांबद्दलची ही माहिती :-
 
या पत्रांत र.धों. कर्वे यांनी धर्म, अध्यात्म, बुद्धिप्रामाण्य, साहित्य, लैंगिकता, ब्रह्मचर्य, नैतिकता, मानसशास्त्र, ज्योतिष याविषयीची आपली मते लख्खपणे मांडली आहेत. यात रधोंनी विवेकानंद, गांधीजी, अरविंद घोष, रवींद्रनाथ टागोर, सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावर कठोर प्रहार केले आहेत.
 
रधों म्हणतात, 'कोणताही धर्म तर्कशास्त्राला धरून नाही. आणि बुद्धिमान माणूस तर्कानेच विचार करतो. अध्यात्म बुद्धीतून नव्हे तर श्रद्धेतून निघालेले आहे. त्याला शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे विवेकानंदांच्या मताला मी किंमत देत नाही.'
 
अरविंद घोष, टागोर हे त्यांना ढोंगी वाटतात. टागोर उत्तम कथालेखक आहेत, पण त्यांचा नोबेल पारितोषिक मिळालेला काव्यसंग्रह त्या योग्यतेचा नव्हता. त्यांच्यापाशी मनाचा मोठेपणा नव्हता, असे ते म्हणतात.
 
क्वेट्टात झालेल्या भूकंपाचे कारण माणसांची पापे आहेत, असे म्हणणे हा गांधींचा मूर्खपणा होता आणि त्यांच्या ब्रह्मचर्याच्या कल्पनेला काहीही शास्त्रीय आधार नसल्यामुळे धार्मिक वेड या पलीकडे त्याला महत्त्व नाही, अशीही मल्लिनाथी ते करतात.
 
रधोंच्या परखडपणाचे तडाखे ना. सी. फडके, अत्रे यांनाही बसले आहेत. मामा वरेरकर हे त्यांच्यापेक्षा उत्तम कादंबरीकार, नाटककार होते असे म्हणतानाच मराठीत उत्तम कादंबरीकार नाही, असेही ते सांगून टाकतात.
 
विवाहबाह्य संबंध आणि चारित्र्यहीनतेवर त्यांनी आपली मते स्वच्छपणे नोंदवली आहेत आणि सामाजिक सुधारणेत लोकांचा अडाणीपणा आणि सरकारचे अडथळे याच मोठ्या अडचणी आहेत, असेही सांगून टाकलं आहे.
 
==वारसा ==