"विद्रोही साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
या संमेलन भरवणार्‍या संस्थांपैकी एका संस्थेचे नाव नक्की ’[[विद्रोही सांस्कृतिक चळवळ]]’ हे आहे. या संस्थेचे अध्यक्ष २००२ साली डॉ. अजीज नदाफ होते, आणि २०१३सालचे अध्यक्ष प्रा. रणजित परदेशी आहेत. महाराष्ट्र साहित्य-सांस्कृतिक परिषद या नावाची संस्थाही हे संमेलन भरवते.
 
==विद्रोही साहित्य संमेलानांचे तथाकथित प्रयोजन==
प्रस्थापित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे भटा-ब्राह्मणांचे, प्रतिगाम्यांचे, प्रस्थापितांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या उदातीकरण करणारे व शोषित, दुबळ्या, वंचित वर्गांना बेदखल करणारे आहे, अशी घणाघाती टीका करून दीड दशकापूर्वी कथित मराठी सारस्वतांची साहित्य क्षेत्रातील दादागिरी, चमकोगिरी व बडेजावपणा मोडित काढून उपेक्षितांच्या परिवर्तनवादी साहित्याचा जागर मांडण्यासाठी काही पुरोगामी विचारवंत, कार्यकर्ते व साहित्यिकांनी विद्रोही सांस्कृतिक चळवळ स्थापन केली व त्या माध्यमातून स्वतंत्र विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलन महाराष्ट्रातील विविध ठिकाणी दरवर्षी भविष्याचा प्रघात पडला.
 
परंतु पुरोगामी साहित्यिकांना अहंकार, आत्मस्तुती, आत्मप्रौढी,परस्परांचा छुपा आकस व स्वत:ची स्वतंत्र साहित्यिक सुभेदारी करण्याची हौस या अवगुणाने ग्रासलेल्या विद्रोही साहित्यिक व विचारवंतांत फूट पडली. विद्रोही साहित्य संमेलनाच्या नावावर दरवर्षी विविध ठिकाणी जत्रा भरू लागल्या. स्थानिक प्रतिष्ठित मान्यवरांना पुढे करून संमेलन घ्यायचे आणि स्वत:चे व स्वत:च्या गटाचे उदात्तीकरण कसे प्रभावीपणे करता येईल याचे आडाखे बांधायचे असे प्रकार विद्रोही सांस्कृतिक संमेलनाच्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवतात.
 
आज तथाकथित प्रतिगामी शक्ती अत्यंत संघटित, आक्रमक व वर्चस्ववादी होत असताना पुरोगामित्वाचा विचार घोकणारे बोलघेवडे विद्रोही साहित्यिक व विचारवंत मात्र आपापल्या वेगळ्या राहुट्या करून असंघटितपणाचा व गटबाजीचा साक्षात्कार घडवीत आहेत. विचार व आचारात सांगड घातली नाही तर विचार वांझोटे ठरतात. फुले-शाहू-आंबेडकर-साठे यांचे विचार संमेलनात मंचावर बेंबीच्या देठापासून घोकायचे प्रत्यक्ष आचरणात मात्र या महापुरुषांच्या विचाराला बगल देण्याचा प्रकार विद्रोही संमेलनांतून दिसून येतो.
 
* १ले '''विद्रोही साहित्य संमेलन''' : [[धारावी]] (मुंबई), ७ फेब्रुवारी १९९९, संमेलनाध्यक्ष : [[बाबुराव बागूल]]. उद्‌घाटनाचे भाषण डॉ. [[आ.ह. साळुंखे]] यांनी केले होते.