"जयंत भालचंद्र बापट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मूळचे वाईचे असलेले जयंत भालचंद्र बापट (जन्म : नक्की माहीत नाही, प...
(काही फरक नाही)

२१:३३, १० एप्रिल २०१६ ची आवृत्ती

मूळचे वाईचे असलेले जयंत भालचंद्र बापट (जन्म : नक्की माहीत नाही, पण बहुधा इ.स. १९३७) हे ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेले एक मराठी गृुहस्थ आहेत. इ.स.१९६५ साली त्यांना अमेरिकेतील उटाह विद्यपीठाकडून आणि ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठाकडून पीेचडीसाठी संधी चालून आली.. मोनाशने परतीच्या प्रवासाचे भाडे देण्याची बापटांची विनंती मान्य केल्यामुळेच केवळ ते मेलबोर्नच्या मोनाश विद्यापीठात दाखल झाले आणि तेथे पीएचडी मिळवून ते तेथेच ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे प्राध्यापक झाले. इ.स. १९९७ साली निवृत्त झाल्यानंतर तयांनी संशोधनात्मक पुस्तके लिहायला सुरुवात केली.

बापट हे मोनाश आशिया इन्स्टिट्यूट, ऑस्ट्रेलियन इंडियन बिझिनेस अॅन्ड कम्युनिटी वेलफेअर ट्रस्टसारख्या अनेक संस्थांचे हवेहवेसे वाटणारे प्रतिनिधी आहेत. बापटांचे 'Goddesses of India, Nepal and Tibet' हे पहिले पुस्तक मोनाश आशिया इन्स्टिट्यूटच्या तत्कालीन निदेशक असलेल्या Marica Vicziany यांच्या मदतीमुळेच प्रकाशित होऊ शकले.

१९८०मध्ये बापटांच्या मित्राची पत्नी कॅन्सरने वारली आणि त्यांना कधी नव्हे तू मरणोपरान्त करावयाच्या धार्मिक विधीची गरज पडली. बापटांना संस्कृत चांगले येई, त्यामुळे मित्राने त्यांची मदत मागितली. बापटांनी ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या दातार नावाच्या गृहस्थांकडून हिंदू पौरोहित्याचे प्राथमिक धडे घेतले आणि यथोचित क्रियाकर्म केले. (दातार पुढे ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे रहायला गेले.)

त्यानंतर जयंत बापटांनी ऑस्ट्रेलियात हिंदू पौरोहित्याची कामे स्वीकारायला सुरुवात केली. २०११ सालापर्यंत त्यांना ७००हून अधिक जणांकडून धार्मिक विधींची निमंत्रणे आली. जयंत भालचंद्र बापट हे आता ऑस्ट्रेलियातील अधिकृत भटजी आहेत.

बापट हे मेलबोर्नमधील 'ऑस्ट्रेलियन इंडियन सोसायटी ऑफ व्हिक्टोरिया (AISV)'चे संस्थापक सदस्य आहेत. ही संस्था भारतीय आणि अन्य स्थानिक लोकांमधला एक मोलाचा दुवा आहे. भारतातून पगारी पुरोहित येईपर्यंत सोसायटीने आयोजित केलेल्या सर्व प्रकारच्या पूजा करायचे बापटांनी मान्य केले आहे. .

जयंत भालचंद्र बापट यांनी लिहिलेली पुस्तके

  • The Jātipurāṇas of the Gurava temple priests of Maharashtra.
  • The Indian Diaspora : Hindus and Sikhs in Australia (सहलेखक : पुरुषोत्तम बिलिमोरिया आणि फिलिप ह्यूजेस)
  • The Iconic Female : Goddesses of India, Nepal and Tibet (सहलेखिका आयान मॅबेट)
  • महाराष्ट्रातील कोळी समाज (आगामी)
  • ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेले भारतीय (प्रकाशनाधीन)
  • बापटांनी एक मराठी कादंबरीही लिहिली आहे.
  • जयंत भालचंद्र बापट यांचे समग्र लिखाण (आगामी)

पुरस्कार

  • जयंत बापट यांना २०११ साली त्यांच्या शैक्षणिक आणि अन्य सामाजिक कार्यासाठी Medal of the Order of Australia (OAM) हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संदर्भ

  • [१](प्रीति जब्बाल यांचा लेख)]