"मसूद अझर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २०:
 
अझरने कश्मीर विधानसभा, लोकसभा यावर हल्ले आयोजित केले. पठाणकोट हल्ल्याचाही तो सूत्रधार होता. असा दहशतवादी अझर पाकिस्तानात मोकाट असतो. आयएसआयच्या सांगण्यानुसार तो वागत असतो.
 
==पठाणकोटच्या लष्करी विमानतळावर हल्ला आणि चीनचा यूनोत नकाराधिकार==
पठाणकोट हल्ल्याचं नेतृत्व जैश ए महंमदच्या मसूद अझरने केले होते. दहशतवाद्यांना भारताच्या हद्दीत आल्यानंतर आपल्या टॅक्सीने आतमधे आणणाऱ्या इकागर सिंगला पाकिस्तानातल्या बहवालपूरमधून फोनवरून बोलावण्यात आले होते. गुरदासपूरचे पॊलेस सुपरिटेन्डेन्ट सलविंदर सिंग यांचा फोन दहशतवाद्यांनी हिसकून घेतला आणि त्यावरून बहवालपूरला फोन केले. दहशतवाद्यांना हाताळणाऱ्या लोकांशी या फोनवरून संभाषणे झाली. बहवालपूर हे जैश ए महंमदचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. दहशतवाद्यांपैकी किमान एकाचा ठावठिकाणा लागला होता. दहशतवाद्यांकडली शस्त्रे आणि इतर वस्तूंवर पाकिस्तानी उत्पादकांचा वा व्यापाऱ्यांचा ठसा होता.
 
भारत सरकारने हे सारे पुरावे पाकिस्तान सरकारपुढे ठेवले. अझर आणि जैश ए महंमदच्या पुढाऱ्यांच्या आवाजाचे नमुने भारत सरकारने मागवले. पाकिस्तानने ते दिले नाहीत. अझरला पकडा अशी मागणी भारताे केली. पाकिस्तानने ती मान्य केली नाही. युनायटेड नेशन्सने अझरला दहशतवादी जाहीर करावे, अशी मागणी भारतानं केली. चीननं ती मागणी नकाराधिकार वापरून तांत्रिक कारणांसाठी धुडकावून लावली.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मसूद_अझर" पासून हुडकले