"अश्विनी धोंगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: तीन कविता संग्रह, सहा कादंबर्‍या, दोन प्रवास वर्णने, तीन टीकात्म...
(काही फरक नाही)

१४:३८, २५ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

तीन कविता संग्रह, सहा कादंबर्‍या, दोन प्रवास वर्णने, तीन टीकात्मक लेखसंग्रह, लहान मुलांसाठी १५-२० बालपुस्तके आणि इतर विषयावर १९ पुस्तके लिहिणार्‍या डॉ. अश्विनी रमेश धोंगडे या अश्विनीताई या इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. स्त्रीवादी लेखिका म्हणून त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे.

अश्विनी घोंगडे या कथालेखक द.के. बर्वे यांच्या कन्या. घरात लहानपणापासूनच साहित्यिक वातावरण होते. वडील हे लेखक आणि दिलीपराज प्रकाशनचे मालक असल्याने अनेक लेखकांचे त्यांच्या घरी जाणे येणे असे. अश्विनीताई पाचवी ते सहावीत असताना त्यांनी लिहिलेल्या कविता आणि लेख नववी आणि दहावीच्या मुलांना वाचून दाखविले जात असत. महाविद्यालयात गेल्यानंतर मग त्या दोन दैनिकांसाठी लिहायला लागल्या. अजूनही वर्तमानपत्रांतून आणि मासिकांतून अश्विनी धोंगडे यांचे लेख वाचायला मिळतात.

अश्विनी धोंगडे उत्तर कोरियात एका शिष्टमंडळाच्या सभासद म्हणून गेल्या होत्या. आल्यावर त्यांनी ’देशांतर’ हे प्रवास वर्णन लिहिले. अश्विनी धोंगडेंची कन्या युनोत काम करीत असताना त्यांना फिनलंडला जाण्याचा योग आला. त्या प्रवासावर त्यांनी मध्यरात्रीच्या सूर्याचा देश हे पुस्तक लिहिले.

अश्विनी धोंगडे यांनी लिहिलेल्या `स्त्रीवादी स्वरूप आणि उपयोजना’ या पुस्तकाची सहावी आवृत्ती निघाली आहे, आणि एम.ए.च्या अभ्यासक्रमातही त्याचा समावेश आहे. `स्त्रीसुप्त’च्या कविताही दोन चार पाठ्यपुस्तकात आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्याक्रमात समाविष्ट झाल्या आहेत.


  • अन्वय (कवितासंग्रह)
  • अपौरुषेय (कवितासंग्रह)
  • घरकोंबडा
  • जगणे व्हावे सुंदर म्हणुनी (ललित)
  • जास्मिन (रूपांतरित कादंबरी)
  • देशांतर (प्रवास वर्णन)
  • पाषाण पुरुष (अनुवादित कादंबरी; मूळ -वॉशिग्टन क्वेअर)
  • बाई डॉट कॉम (स्त्रीविषयक)
  • बायकांविषयी बरेच काही (स्त्रीविषयक)
  • बाळंतपण : बोल अनुभवांचे (सव्वाशे स्त्रियांच्या अनुभवांचे सांस्कृतिक संचित)
  • बिलंदर, बारीकराव आणि इतर कथा (बालसाहित्य)
  • मध्यरात्रीच्या सूर्याचा देश - फिनलंड (माहितीपर, प्रवास वर्णन)
  • मनस्वी (कथासंग्रह)
  • मराठी भाषा आणि शैली (सहलेखक - डॉ. रमेश धोंडगे)
  • मार्टिन ल्युथर किंग ... अमेरिकेतील दलित-शोषित कृष्णवर्णीय समा ...वर्तमान
  • यशच्या कल्पक कथा (बालसाहित्य)
  • सडकछाप (अनुवादित मूळ इंग्रजी लेखक - मेहेर पेस्तनजी
  • संदर्भ स्त्री पुरुष (माहितीपर) ...
  • सुदर्शना आणि इतर कथा (बालसाहित्य)
  • स्त्रीवादी समीक्षा : स्वरूप आणि उपयोजन (स्त्रीविषयक)
  • स्त्री-सुप्‍त (कवितासंग्रह)
  • स्वातंत्र्ययोद्धा मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) (व्यक्तिचित्रण)
  • होरपळ आणि स्पर्श (कादंबरी)


{वर्ग:मराठी लेखक]]