"शांताराम दातार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शांताराम दातार (जन्म : इंदूर, ८ जून, इ.स. १९४२) हे ठाणे जिल्ह्यातील...
 
(चर्चा | योगदान)
ओळ १४:
 
आणीबाणी उठल्यानंतर स्थापन झालेल्या तत्कालीन जनता पक्षाचे कार्यकर्ते, [[रामभाऊ म्हाळगी]] यांच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सक्रिय भाग घेतला. पुढे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाणी परिषदेचे आयोजन, वनवासी कल्याण आश्रमाचे अनेक वर्षे जिल्हा उपाध्यक्षपद, लहान मुलांमध्ये भगवद्गीतेचा विचार रुजावा म्हणून भगवद्गीता अभ्यास मंडळाच्या माध्यमातून भगवद्गीतेचा प्रसार, अशा अनेकविध उपक्रमांमधून दातारांचा सहभाग लक्षणीय आहे.
 
वकिलीचा व्यवसाय करताकरता ते अनेक बँकांचे व संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून ते काम पाहात असतात.
 
वकिली व्यवसायास सुरुवात केल्यानंतर व्यवसायात कोणकोणत्या अडचणी येतात, त्यांची पूर्ण जाणीव ठेवून नवोदित वकिलांना ते नेहमीच मदतीचा हात देत असतात.
 
==मराठी भाषेसाठी ==
महाराष्ट्र राज्यातच मराठी भाषेची होत असलेली गळचेपी, शासनाकडून मराठीविरोधी धोरणाचा अवलंब या सर्व गोष्टींविरुद्ध आवाज उठविण्याकरिता स्थापन झालेल्या [[मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था|मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थेचे]] अ‍ॅड. दातार हे संस्थापक अध्यक्ष आहेत. मोर्चे, निवेदने, परिषदांचे आयोजन, धरणे, आंदोलन इ. द्वारे न्यायालयीन कामकाजात मराठीचा वापर, या विषयाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यास ही संस्था यशस्वी झाली आहे. न्यायालयीन कामकाजात मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा याकरिता अधिसूचना काढण्यास मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थेने शासनाला भाग पाडले आहे. या सर्वाच्या मागे दातार यांचे परिश्रम कारणीभूत आहेत.
 
ग्रंथालीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘न्यायालयीन व्यवहार आणि मराठी भाषा’ या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये दातार वकिलांचा महत्त्वाचा सहभाग आहे. तसेच दिवाणी दावा दाखल करण्यापासून तो चौकशीला न्यायालयासमोर येईपर्यंतच्या प्रक्रियेबाबतच्या मराठीमधील पुस्तकाचे ते एक प्रमुख लेखक आहेत.
 
==पुरस्कार आणि सन्मान==
* शांताराम दातार यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून पुण्यात २००२ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘महाराष्ट्र राज्याचे भाषिक धोरण मराठीची अवहेलना करणारे आहे’ या परिसंवादात वक्ता म्हणून सहभागी होण्यासाठी त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात आले होते.
* मराठी भाषेच्या प्रचाराच्या दीर्घ सेवेबद्दल अ‍ॅड. दातार यांना सन्मित्रकार स.पां. जोशी स्मृती पुरस्कार देऊन ८ ऑगस्ट २००५ रोजी ‘लोकसत्ता’चे संपादक, ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.
* मराठी भाषेच्या प्रचाराच्या दीर्घ सेवेबद्दल अ‍ॅड. दातार यांना सन्मित्रकार स.पां. जोशी स्मृती पुरस्कार देऊन ८ ऑगस्ट २००५ रोजी ‘लोकसत्ता’चे संपादक, ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
* कल्याणमधील सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सवाला शंभर वर्षे पूर्ण झाली या निमित्ताने संस्थेच्या वतीने दातारांना शताब्दी पुरस्कार देयात आला. (इ.स. २००९)
 
 
[[वर्ग:सामाजिक कार्यकर्ते]]