"शांताराम दातार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शांताराम दातार (जन्म : इंदूर, ८ जून, इ.स. १९४२) हे ठाणे जिल्ह्यातील...
(काही फरक नाही)

०१:४१, २५ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

शांताराम दातार (जन्म : इंदूर, ८ जून, इ.स. १९४२) हे ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे राहणारे एक चळवळे वकील आहेत.

बालप्ण आणि शिक्षण

शांताराम दातार यांचे आई-वडील त्यांच्या लहानपणीच वारले. त्यांच्या पाच बहिणी व एक भाऊ यांनी त्यांचे संगोपन केले.

दातारांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. निरनिराळ्या ठिकाणी छोट्या-मोठ्या नोकऱ्या करून पुढे एल.एल.बी.पर्यंतचे शिक्षण त्यांनी इंदूर येथेच घेतले.

मुंबई परिसरात वकिली व्यवसाय करावयाचा या हेतूने १९६८ साली दातार वकील कल्याणला आपल्या बहिणीकडे आले आणि कल्याणचे रहिवासी होऊन इथल्या समाजजीवनाशी एकरूप झाले.

सामाजिक/राजकीय कार्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांतून दातारांमध्ये समाजसेवेची आवड लहानपणापासूनच निर्माण झालेली होती. कल्याण येथे वकिली व्यवसायास सुरुवात केल्यानंतर त्यांनी १९७० मध्ये भारतीय मजदूर संघाच्या व १९७२ पासून जनसंघाच्या कामास सुरुवात करून १९७४ मध्ये ते भारतीय जनसंघाचे कल्याण शाखेचे उपाध्यक्ष झाले.

जून १९७५ मध्ये देशात आणीबाणी घोषित झाली. वकिली व्यवसायात नुकतेच नाव होत असताना व घरात पत्‍नी व तीन लहान मुले असे कुटुंब अवलंबून असताना विचलित न होता आणीबाणीविरुद्धच्या लढय़ात दातार सहभागी झाले. आणीबाणीविरुद्ध घोषणा दिल्या, पत्रके वाटली आणि कारावास भोगला.

आणीबाणी उठल्यानंतर स्थापन झालेल्या तत्कालीन जनता पक्षाचे कार्यकर्ते, रामभाऊ म्हाळगी यांच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सक्रिय भाग घेतला. पुढे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाणी परिषदेचे आयोजन, वनवासी कल्याण आश्रमाचे अनेक वर्षे जिल्हा उपाध्यक्षपद, लहान मुलांमध्ये भगवद्गीतेचा विचार रुजावा म्हणून भगवद्गीता अभ्यास मंडळाच्या माध्यमातून भगवद्गीतेचा प्रसार, अशा अनेकविध उपक्रमांमधून दातारांचा सहभाग लक्षणीय आहे.