"शीर्षक गीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: चित्रपटाच्या अगदी सुरुवातीला किंवा दूरचित्रवाणीच्या कार्यक्र...
(काही फरक नाही)

००:३२, २४ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

चित्रपटाच्या अगदी सुरुवातीला किंवा दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमाआधी वाजवल्या जाणार्‍या गीताला शीर्षक गीत म्हणतात.

आज दूरचित्रवाणीच्या मनोरंजन वाहिन्यांवरील मालिकांची शीर्षक गीते लोकप्रिय असली तरी त्याचा खरा पाया हा सरकारी वाहिनी दूरदर्शनने घातला. अगदी सुरुवातीच्या काळातील ‘हमलोग’, ‘बुनियाद’, सुरभि’, ‘मालगुडी डेज्’, ‘रामायण’, ‘महाभारत’ या हिंदी मालिकांची तर ‘गोटय़ा’, ‘संस्कार’ ‘दामिनी’, ‘महाश्वेता’, ‘परमवीर’, हॅलो इन्स्पेक्टर’, ‘स्वामी’ आदी मराठी मालिकांची शीर्षक गीते ही त्यातील काही ठळक उदाहरणे म्हणता येतील. ’गोटय़ा’ मालिकेचे ‘बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे बियाणे रुजावे माळरानी खडकात’, ‘संस्कार’ मालिकेचे ‘तेज स्पर्शाने दूर होई अंधार जैसा मुळांचा वृक्षा असे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार, मना घडवी संस्कार’ किंवा ‘स्वामी’ मालिकेचे ‘माझे मन तुझे झाले तुझे मन माझे झाले’ ही शीर्षक गीते आजही अनेकांच्या ओठावर आहे. संगीतकार व गायक श्रीधर फडके यांनी गायलेल्या ‘संस्कार’ मालिकेच्या शीर्षक गीताची फर्माईश आजही श्रीधर फडके यांना त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमात केली जाते.

अल्फा मराठी वाहिनीवरील पहिली महामालिका म्हणून जियाचा उल्लेख केला जातो त्या ‘आभाळमाया’ या मालिकेचे ‘उडतो तो जीव लागते ती आस बुडतो तो सूर्य उरे तो आभास, कळे तोच अर्थ उडे तोच रंग, ढळतो तो अश्रू सुटतो तो संग, दाटते ती माया, सरे तोच काळ, ज्याला नाही ठाव ते तर आभाळ, घननीळा डोह, पोटी गूढमाया, आभाळमाया’..हे देवकी पंडित यांनी गायलेले, मंगेश कुलकर्णी यांनी लिहिलेले आणि संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेले शीर्षक गीत अमाप लोकप्रिय झाले. खासगी मनोरंजन वाहिन्यांवरील आजच्या लोकप्रिय शीर्षक गीतांचा पाया ‘आभाळमाया’ने घातला असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.