"प्रणव देव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रणव राजेंद्र देव हा एक लयान वयापासून कीर्तने करणारा कीर्तनका...
(काही फरक नाही)

११:४०, १९ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

प्रणव राजेंद्र देव हा एक लयान वयापासून कीर्तने करणारा कीर्तनकार आहे. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रांजणगाव महागणपती देवस्थानचे मुख्य विश्वस्त राजेंद्र देव यांचा प्रणव हा मुलगा आहे. तो २००२ सालापासून महाराष्ट्रात, देशभरात आणि भारताबाहेरही कीर्तने सादर करीत आहे.

वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून अभिनय, साहित्य, संगीत आणि कीर्तन या विविध कलाप्रकारांसाठी प्रणवला पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्राची परंपरा आणि वारसा कीर्तनाच्या माध्यमातून जतन करणारा प्रणव संगणक अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षांचे शिक्षण घेत आहे.

कीर्तनामध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या प्रणव याला कीर्तनातून कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि ताणतणाव नियोजन यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रातूनही मागणी असते.

युवा कीर्तनकार प्रणव देव याला केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. या विषयामध्ये राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळालेला एकमेव कीर्तनकार आहे.