"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
 
==नाट्यकोश==
 
मुख्यत्वे मराठी भाषेतील नाट्यसृष्‍टीची साद्यंत माहिती देणारा ’मराठी नाट्यकोश’, मराठी लेखक डॉ. वि.भा. देशपांडे यांनी संपादित केला आहे. १२००हून अधिक पृष्ठांच्या या ग्रंथाचा हिंदी अनुवाद अमेय इन्स्पायरिंग बुक्सतर्फे प्रकाशित करण्यात आला आहे.
 
==नाटकांचे प्रकार==
 
* [[अतिनाट्य (मेलोड्रामा)]]
* [[अभिजात नाटक]]
Line १२४ ⟶ १२२:
 
==नाट्यशास्त्र अध्यापन संस्था==
 
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (नाट्यशास्त्र विभाग), औरंगाबाद
* चतुरंग प्रतिष्ठान, पुणे
Line १३४ ⟶ १३१:
 
==नाट्य महोत्सव==
 
महाराष्ट्रात वेळोवेळी अनेक नाट्य महोत्सव होतात. महोत्सवांत उत्तमोत्तम नाटके रंगमंचावर सादर होतात. काही नाट्य महोत्सव --
 
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागाचा वार्षिक नाट्यमहोत्सव (१९७३पासून), औरंगाबाद
* विनोद दोशी (स्मृती) नाट्य महोत्सव (इ.स. २००९पासून), पुणे
* पिंपरी-चिंचवड येथील प्रयोग या संस्थेचा प्रायोगिक व बालनाट्य महोत्सव
* महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव (इ.स.. १९६१पासून)
* [[अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन]] हे इ.स. १९०५ पासून भरत आले आहे.
 
==[[नाट्य स्पर्धा|नाट्यस्पर्धा]]==
 
* फिरोदिया करंडक एकांकिका स्पर्धा
* चंद्र सूर्य रंगभूमी या नृत्य-नाट्य-संगीत संस्थेच्या आंतरशालीय एकांकिका स्पर्धा
Line १६४ ⟶ १५९:
==नाट्यगृहे==
नाटके आणि अन्य करमणुकीचे किंवा राजकीय व सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक नाट्यगृहे आहेत.यांतील बरीच त्या त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी बांधलेली आहेत, आणि या सभागृहांचे व्यवस्थापन त्या संस्था पाहतात.
 
==नाट्यसंगीत==
मराठी संगीत नाटकांच्या उत्कर्षकाळात [[मराठी नाट्य संगीत]] या नावाचा एक नवाच गीतप्रकार उदयास आला. मराठी नाट्यसृष्टीची शताब्दी झाली तरी संगीताचा हा प्रकार महाराष्ट्रात अजूनही लोकप्रिय आहे.
 
==आधुनिक मराठी नाटके==
९०च्या आणि एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात नाटकाकडे मराठी प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. या काळातील उत्तम नाटकांना नोंद घेण्याइतपत प्रेक्षक प्रतिसाद मिळत नव्हता. टीव्ही मालिकांच्या सस्त्या करमणुकीशी स्पर्धा करत व्यावसायिकांनी विनोदी नाटकं देऊन प्रेक्षकांना वश करून पाहण्याचा सपाटा लावला होता. सर्वसामान्य माणसांच्या जीवनशैलीत जागतिकीकरणोत्तर बदलांनी इतका प्रभाव टाकला होता की मराठी मध्यमवर्गाने तोवर टिकवून धरलेली त्याची सांस्कृतिक ओळखही बदलू लागली होती. या बदलांत मराठी माणसाच्या करमणुकीच्या यादीतलं नाटकाचे अग्रस्थान घसरत घसरत खूप खाली गेले. तशात मराठी चित्रपटांनी आश्चर्यकारकरीत्या उचल खाल्ली आणि नाटकांना आणखी एक धक्का बसला. असे असले तरी एकविसाव्या शतकाच्या दुसर्‍या दशकात मराठी नाटकांना परत ऊर्जितावस्था आली. या काळात रंगभूमीवर नवीनच किंवा नव्याने येऊन प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेली नाटके अशी :
 
‘अबीर गुलाल’, ‘अ फेअर डील’, ‘ऑल दि बेस्ट, ‘ऑल दि बेस्ट २’, ‘इंदिरा’, ‘कहानी में ट्विस्ट’, ‘के दिल अभी भरा नही’, ‘गोष्ट तशी गमतीची’, ‘ठष्ट’, ‘डोण्ट वरी बी हॅपी’, ‘ढोलताशे’, ‘त्या तिघांची गोष्ट’, ‘दोन स्पेशल’, ‘परफेक्ट मिसमॅच’ ‘लगीनघाई’, 'वाडा चिरेबंदी’, ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’, ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘श्री बाई समर्थ’, ‘स्पिरीट’, ‘सेल्फी’, वगैरे. (अपूर्ण यादी)
 
 
'''बृहन्महाराष्ट्रातील प्रमुख नाट्यगृहे :'''
"https://mr.wikipedia.org/wiki/नाटक" पासून हुडकले