"श्रीधर कृष्ण कुलकर्णी रेठरेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३८:
 
==बहिष्कार==
 
पण पुढे पठ्ठे बापूराव आणि [[पवळा]] या दोघांवर सर्वांनी बहिष्कार टाकला. तमाशाचा फड बंद पडला. आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे बापूराव व [[पवळा]] या जोडीने ९०० रुपयांचा करार करून स्वतःचा लिलाव केला. मुंबईच्या अबू शेठनी लिलाव घेतला. मुंबईच्या एल्फिन्‍स्टन थिएटरवर [[पवळा]] पठ्ठे बापूराव यांना पाहण्यासाठी तिकीट लावले. दोन आण्याच्या तिकिटावर दररोज चारशे रुपयांचा गल्ला जमत असे. असे नामदेव व्हटकरांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. पण पुढे पवळा बेबनावामुळे पठ्ठे बापूरावांचा फड सोडून निघून गेली. पठ्ठे बापूरावांनी दुसर्‍या स्त्रीला घेऊन तमाशाचा फड चालू ठेवण्याचा प्रयत्‍न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. ’कली युगाचा ऐका दाखला ! पठ्ठे बापूराव भुलला पवळिला ` असे ठामपणे सांगणारा हा शाहीर पुहा एकदा `शाहीर पठ्ठे बापूराव आणि नामचंद पवळाबाई यांचा ढोलकीतील तमाशा’ या नावाने नव्या जोमाने सुरू झाला. खर्‍या अर्थाने [[पवळा]] बापूरावांशी एकरूप झाली होती. ६ डिसेंबर १९३९ साली [[पवळा]] काळाच्या पडद्याआड गेली. लक्ष्मी गेली, लोकप्रियता गेली. एकेकाळचा तमाशा सम्राटाला अखेरचे दिवस विपन्नावस्थेत कंठावे लागले. त्यांच्याच तमाशात काम करणार्‍या `ताई परिंचेकर' ह्या बाईने त्यांना शेवटपर्यंत सांभाळले. याच काळात पुण्यातील बापूसाहेब जिंतीकर यांनी बापूरावांना आधार दिला. त्यातूनच या जिंतीकरांनी बापूरावांच्या कवनांचे संकलन केले. १९४२ साली बापूरावांचा श्रीमंत आबासाहेबांच्या हस्ते जॉन स्मॉल मेमोरियल पुणे येथे जाहीर सत्कार झाला. या श्रेष्ठ कवीने २२ डिसेंबर १९४५ रोजी आपली इहलोकीची यात्रा संपविली. हा शाहीर सांगली जिल्ह्याचे भूषण होता. आजही रातधुंदीत जागवा म्हणत त्यांची कवने गात शाहीर रात्री जागवितात.
 
==चित्रपट/नाटक==
* पठ्ठे बापूरावांच्या जीवनावर त्यांच्याच नावाचा मराठी चित्रपट इ.स. १९५० मध्ये निघाला. राजा नेने दिग्दर्शक होते.
* पठ्ठे बापूराव (नाटक, लेखक [[मो.ग.रांगणेकर]])
 
==पुरस्कार==
* पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान हे दरवर्षी ’शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ देते. हा पुरस्कार मिळालेल्या नृत्यांगना: दिदराबाई गुळखंडकर (२०१३), [[आशा काळे]] (२०१५),
* पुणे महानगरपालिका १९९५ सालापासून दरवर्षी ’लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार देते. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती : [[शाहीर साबळे]] (१९९७), [[सरोजिनी बाबर]] (१९९८?), राजेंद्र दूरकर (२००१), [[काळू बाळू]] (२००५), [[सुलोचना चव्हाण]] (२००७), गुलाबबाई संगमनेरकर (२००८), शाहीर राजाराम जगताप (२००९), साहेबराव नांदवळकर (२०१०), मधुकर नेराळे (२०११), कांताबाई तुकाराम खेडेकर (सातारकर) (२०१३), [[मधू कांबीकर]] (२०१४