"राधाकृष्ण माथूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: राधाकृष्ण माथूर (जन्म २५ नोव्हेंबर, इ.स. १९५३) हे भारताचे मुख्य माह...
(काही फरक नाही)

२३:१८, १३ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

राधाकृष्ण माथूर (जन्म २५ नोव्हेंबर, इ.स. १९५३) हे भारताचे मुख्य माहिती आयुक्त आहेत. डिसेंबर २०१५ साली त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारला. ते यापूर्वी विशेष व अतिरिक्त संरक्षण सचिव होते.

माथूर हे मणिपूर-त्रिपुरा केडरचे १९७७च्या तुकडीतील सनदी अधिकारी आहेत. आयआयटी कानपूर येथून बी.टेक पदवी घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली आयआयटीतून उद्योग अभियांत्रिकीत एम.टेक केले. स्लोव्हेनिया येथून त्यांनी एमबीए केले. इ.स. २००० ते २००८ या काळात त्यांनी त्रिपुरात विविध पदांवर काम करताना शेवटी त्या राज्याचे मुख्य सचिवपदही भूषवले होते. संरक्षण खात्यात सचिव होण्यापूर्वी ते लघु व मध्यम उद्योग खात्याचे सचिव झाले.

राधाकृष्ण माथूर यांना माहिती आयुक्तपदावर वयाच्या पासष्टीपर्यंत म्हणजे इ.स. २०१८पर्यंत काम करता येईल.