"सुधीर तेलंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

मराठी व्यंगचित्रकार
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुधीर तेलंग (जन्म: बिकानेर, इ.स. १९६०; मृत्यू : इ.स. २०१६) हे एक मराठी...
(काही फरक नाही)

००:४९, ११ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

सुधीर तेलंग (जन्म: बिकानेर, इ.स. १९६०; मृत्यू : इ.स. २०१६) हे एक मराठी व्यंगचित्रकार होते. त्यांची व्यंगचित्रे विविध वर्तमानपत्रांतून ३५ वर्षे झळकत होती. त्यांच्या व्यंगचित्रांच्या प्रेमात असलेल्या मुलीशीस त्यांचा विवाह झाला होता.

लहानपणापासून तेलंग यांना टिनटिन, फॅण्टम, ब्लॉण्डी या व्यक्तिरेखांचे आकर्षण होतेच. त्यातून ते व्यंगचित्रांकडे वळले. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी पहिले व्यंगचित्र काढले, तेही इंदिरा गांधींचे. लालकृष्ण अडवाणींची किमान हजार चित्रे त्यांनी काढली आहेत. तेलंगांच्या व्यंगचितरांतून जो सुटला त्याची कारकीर्द संपली असे मानले जात असे.

तेलंगांची व्यंगचित्रे प्रथम ‘राजस्थान पत्रिके’त आली. नंतर १९८२ मध्ये ‘द इलस्ट्रेटेड वीकली’त, मग दिल्लीच्या एका हिंदी पत्रात येऊ लागली. पुढे ‘हिंदुस्तान टाइम्स’, ‘इंडियन एक्स्प्रेस’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ आणि ‘एशियन एज’ असा त्यांच्या व्यंगचित्रांचा प्रवास होत गेला.

सार्वकालिक व्यंगचित्रे

सुधीर तेलंग यांची भ्रष्टाचार, गरिबी, निरक्षरता, बेरोजगारी या समस्यांवरची ३० वर्षांपूर्वीची काही व्यंगचित्रे कालसुसंगत राहिली.