"शंकर पुरुषोत्तम आघारकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्रा. शंकर पुरुषोत्तम आघारकर (जन्म : [[मालवण]], १८ नोव्हेंबर, इ.स. १८८४; मृत्यू : पुणे, २ सप्टेंबर, इ.स. १९६०) हे एक मराठी वनस्पतीशास्त्रज्ञ होते.
 
वडिलांच्या बदल्यांमुळे आघारकरांचेे शालेय शिक्षण ५-६ ठिकाणी झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. वनस्पतीशास्त्र व प्राणिशास्त्र विषय घेऊन ते बी.ए.ची परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. १९०७ साली ते मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजात वनस्पतीशास्त्र शिकवत. पुढे ते एम.ए. झाले.
ओळ १९:
आघारकर हे योजना आयोगाच्या मृदसंधारण आणि वनीकरण समितीचे अध्यक्ष होते. १९४६ साली [[कलकत्ता|कोलकात्याहून]] निवृत्त झाल्यावर ते [[पुणे|पुण्याला]] आले आणि त्यांनी विज्ञानवर्धिनी संस्थेची स्थापना केली. तेथे वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, कवकशास्त्र इत्यादी विषयांवर संशोधन चालते.
 
ही विज्ञानवर्धिनी नावाची संस्था-MACS आता [[आघारकर संशोधन संस्था]] म्हणून ओळखली जाते. आघारकरांनी या संस्थेला आपली पुणे व मुंबई येथील सर्व स्थावर मालमत्ता देऊन टाकली.