"अचला जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अचला जोशी (जन्म : इ.स. १९३८) या एक मराठी लेखिका आहेत. दादर हिंदू कॉलन...
(काही फरक नाही)

१३:१०, १ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

अचला जोशी (जन्म : इ.स. १९३८) या एक मराठी लेखिका आहेत. दादर हिंदू कॉलनीतील सुप्रसिद्ध कॉलनी नर्सिंग होमचे डॉ. जी.एम. फडकेहे त्यांचे पिता, तर मूत्रपिंड-तज्‍ज्ञ डॉ. अजित फडके हे त्यांचे सख्खे भाऊ होत. अचला जोशी या मुंबईच्या माटुंग्यामधील श्रद्धानंद आश्रमाच्या अध्यक्ष आहेत. या महिलाश्रमाशी त्या चार दशकांहून अधिक काळ जोडल्या गेल्या आहेत. याच आश्रमातील महिलांच्या रोजगारनिर्मितीसाठी रजया, मसाले बनवून त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ शोधण्याच्या धडपडीतून अचलाताईंमधील उद्योजकता बहरत गेली. त्यांनीच लिहिलेलं 'आश्रम नावाचं घर' हे पुस्तक अचलाताईंचे श्रद्धानंद महिलाश्रमाशी जोडलेले घट्ट नाते दाखवते.

अचलाताई दादरच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकारी आहेत.

अचला जोशी यांच्नी त्यांच्या तळोज्याच्या फॅक्टरीत युरोपियन वाईनच्या तोडीची 'परफेक्ट ब्लेंडिंग' असलेली 'प्रिन्सेस वाइन' बनवली.

पुरस्कार आणि सन्मान

  • इ.स. १९८३ साली, अचला जोशी यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट उद्योजकतेचा राष्ट्रीय पुरस्कारही लाभला आणि 'द फर्स्ट वाइन लेडी' म्हणून त्यांचं नाव देशभर प्रसिद्ध झाले.
  • ८-९-१० नोव्हेंबर, इ.स. २०१३ या कालावधीत सावंतवाडी येथे झालेल्या कोमसापच्या ४थ्या महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

अचला जोशी यांनी लिहिलेली पुस्तके

  • An Amazing Grace
  • आश्रम नावाचे घर
  • हरी नारायण आपटे (चरित्र)
  • ज्ञातपस्वी रुद्र (न.र. फाटक यांचे चरित्र)