"श्रीपाद रघुनाथ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४४:
* हिंदी-मराठी-गुजराती-इंग्रजी कोश : वोरा आणि कंपनीच्या नानूभाई वोरा यांच्या आग्रहास्तव हाती घेतलेल्या या कोशाचे काम पूर्ण होऊ शकले नाही..
* अभिनव शब्दकोश : कोशाच्या पहिल्या भागात हिंदी शब्दांना मराठी व हिंदीप्रतिशब्द दिले होते, तर दुसर्‍या भागात मराठी शब्दांना हिंदी प्रतिशब्द दिली होते. या कोशात उर्दू (अरबी-फारसी) शब्द्दंचा चांगलाच भरणाहोता. शिवाय हिंदी-मराठी वाक्‌प्रचार, म्हणी आणि इतर उपयुक्त माहिती कोशात दिली होती. कोशाच्या १९९६ सालापर्यंत एकूण सहा आवृत्त्या निघाल्या. पहिल्या दोन आवृत्त्या व्हीनस प्रकाशनने काढल्या. (१९५८ची आवृत्ती, पृष्ठसंख्या ४१६, किंमत ५ रुपये. १९६८ची आवृत्ती, पृष्ठसंख्या ६१६, किंमत ८ रुपये). त्यानंतर पुण्याच्या शुभदा प्रकाशनने अनुक्रमे १९८७, १९९०, १९९४ व १९९६ साली कोशाची तिसरी, चौथी, पाचवी आणि सहावी आवृत्ती काढली.
* उर्दू-मराठी शब्दकोश (प्रकाशन १९६८)
* बृहत्‌ हिंदी-मराठी शब्दकोश (मार्च १९६५) : या कोशावर संपादक म्हणून गो.प. नेने यांचे नाव आहे, प्रत्यक्षात त्यांनी या शब्दकोशातला एकही शब्द लिहिलेला नाही.
* बृहत्‌ मराठी-हिंदी शब्दकोश (डिसेंबर १९७१) : या कोशावर संपादक म्हणून गो.प. नेने यांचे नाव आहे, प्रत्यक्षात त्यांनी या शब्दकोशातला एकही शब्द लिहिलेला नाही.
* उर्दू-मराठी-हिंदी त्रैभाषिक कोश : (१९६२) : हा संपूर्ण कोश श्रीपाद जोशी यांनी एकट्याने केला असला तरी कोशावर त्यांचे नाव संकलन-संपादक म्हणून छापले आहे. या कोशाच्या कामाशी कसलाही संबंध नसलेले, अरबी-फारसीचे अर्धवट ज्ञान असलेले आणि मराठीचे अजिबात ज्ञान नसलेले एक तथाकथित विद्वान डॉ. निजामुद्दीन एस. गोरेकर या माणसाने कोशातल्या शब्दोच्चारांमध्ये दुरुस्त न करता येईल इतकी ढवळाढवळ केली आणि कोशावर स्वतःचे नाव समीक्षक-संपादक म्हणून टाकले. श्रीपाद जोशींना हा कोश प्रकाशनानंतर सहा वर्षांनी पहायला मिळाला, तेव्हा त्यांना कोशातल्या या अक्षम्य चुका दिसल्या. मुद्रण प्रतीचे संपादन व प्रुफे तपासणारर्‍याचे नाव पुस्तकावर समीक्षक संपादक म्हणून छापल्याचे हे एकमेव उदाहरण असावे. असे का केले हे विचारले असता, पुण्याच्या हिंदु-ब्राह्मण असलेल्या काय उर्दू येणार असा विचार करून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाने कोशावर एका मुसलमानाचे समीक्षक संपादक म्हणून नाव टाकल्याचा खुलासा महामंडळाने केला. या कोशाची दुसरी आवृत्ती निघाली, त्यावेळी श्रीपाद जोशींना सुचवलेल्या दुरुस्त्या धुडकावून लावून महामंडळाने त्याच जुन्या कोशाचे पुनर्मुद्रण केले.
* उर्दू-मराठी-हिंदी शब्दकोश (नितिन प्रकाशन, १९९७) : हा २०,००० शब्दांचा नवा शब्दकोश श्रीपाद जोशींनी बनवला. कोशाची दुसरी आवृत्ती २००१ साली निघाली.
 
 
(अपूर्ण)
 
{{DEFAULTSORT:जोशी, श्रीपाद रघुनाथ}}
 
 
 
 
 
[[वर्ग:मराठी लेखक]]