"द.श्री. खटावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दत्तात्रेय श्रीधर खटावकर (जन्म: पुणे, ४ एप्रिल, इ.स. १९२९; मृत्यू : प...
(काही फरक नाही)

२३:४८, २४ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

दत्तात्रेय श्रीधर खटावकर (जन्म: पुणे, ४ एप्रिल, इ.स. १९२९; मृत्यू : पुणे, २३ जानेवारी, इ.स. २०१६) हे पुण्यातले एक शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार होते.

खटावकरांनी पुण्यातील मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाची फायबरची मूर्ती् १९७५मध्ये तयार केली. ही देशातील गणपतीची पहिली फायबरची मूर्ती समजली जाते.

शिक्षण

खटावकरांना शालेय शिक्षणात फारसा रस नव्हता. कलेच्या उच्च शिक्षणासाठीत्यांनी पुण्यातील 'इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न आर्ट'मध्ये, म्हणजे आताच्या अभिनव महाविद्यालयात प्रवेश घेतला. नंतर त्यांनी दिल्लीहून कला-शिक्षकाचा अभ्यासक्रम, व मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून कलाविषयक अभ्यासक्रम पूर्ण केला.

व्यवसाय

कल ाशिक्षण पूर्ण केल्यावर, खटावकरांनी लोणीकाळभोरमधील शासकीय प्राथमिक शिक्षण केंद (अध्यापक महाविद्यालय) येथे कलाशिक्षक म्हणून अध्यापनास सरुरवात केली. १९५६ ते १९६३ या कालावधीत त्यांनी पुण्यातील आगरकर हायस्कूल या शाळेमध्ये कला अध्यापकाची भूमिका बजावली. या शाळेनंतर त्यांनी १९६३ ते १९८९ या कालावधीत पुण्यामधील अभिनव कला कॉलेजमध्ये ज्ञानदानाचे काम केले. अभिनव कॉलेजच्या उपप्राचार्यपदावरून ते निवृत्त झाले.

मार्गदर्शकाचे कार्य

खटावकरांनी सुमारे ३५ वर्षांत हजारो विद्याथीर् घडवले. अनेक नामवंत चित्रकार, शिल्पकार, सिने कला दिग्दर्शक, नेपथ्यकार, सजावटकार आणि कलाशिक्षक यांना त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचेे आणि सजावटीचे काम त्यांनी सलग ५५ वर्षे केले. या मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे खटावकरांनी सजवलेले कलात्मक आणि नेत्रदीपक रथ हा पुणेकरांचा अभिमानाचा आणि कौतुकाचा विषय असे.

दुसरी पिढी

द.शी. खटावकरांनंतर त्यांचेे चित्रकला पारंगत पुत्र विवेक खटावकर हेदेखील या क्षेत्रात काम करत आहेत.

पुरस्कार

  • महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रकाराचा पुरस्कार (२००७)
  • विद्या सहकारी बँकेतर्फे देण्यात येणारा 'विद्या व्यास पुरस्कार' (२००८)