"चंद्रकांत सखाराम चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''चंद्रकांत सखाराम चव्हाण''' ([[९ जून]], [[इ.स. १९०६]] - [[५ जुलै]], [[इ.स. १९९६]]) हे '''बाबूराव अर्नाळकर''' या टोपणनावाने लिहिणारे मराठी लेखक होते. ते मराठीतील आघाडीचे रहस्यकथा लेखक होते. त्यांनी एकूण १०४२ रहस्यकथा लिहिल्या. खर्‍या अर्थाने त्यांनी तळागाळातल्या माणसांना मराठी वाचनाची गोडी लावली. चार आणे मालांपासून त्यांनी सुरुवात केली. त्यांचे नायक झुंजार, धनंजय-छोटू, मेजर सुदर्शन, इन्स्पेच्टर दिलीप, दर्यासारंग हे मराठी घरांघरांतून फिरले. तत्कालीन लोकप्रिय कादंबरीकार [[ना.सी. फडके]] यांच्या कादंबर्‍यांपेक्षा जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांना बाबूराव अर्नाळकरांच्या कादंबर्‍या चोरून वाचल्या. ज्या काळात [[साने गुरुजी]] आणि [[वि.स. खांडेकर]] यांचे आणि ऐतिहासिक चरित्रांचे वाचन हेच शालेय विद्यार्थ्यांसाठी योग्य समजले जात होते त्या काळात मुखपृष्ठावर पाठीत सुरा खुपसलेला मृतदेह आणि किंचाळणारी स्त्री असली चित्रे असलेली बाबूरावांची पुस्तके चोरूनच वाचली जात.
 
१९४२च्या चळवळीत तुरुंगात असताना ’सामान्य माणसासाठी लिही’ असे बाबूरावांना सांगण्यात आले. सामान्य माणसाकरिता लिहायचे म्हणजे काय हे बाबूरावांना पडलेले कोडे होते. बाबूरावांना नाटकाची आवड होती. एका नाट्यक्लबाचे ते सभासद होते. त्या नाट्यक्लबातून ते एकदा [[विजयदुर्ग]] किल्ल्यात गेले. आणि परत आल्यावर त्यांनी ’सतीची समाधी’ नावाची गोष्ट लिहिली; ती अस्नोडकरांच्या ’करमणूक’मधून प्रसिद्ध झाली. त्याच दिवशी बाबूरावांना नाटककार [[अच्युत बळवंत कोल्हटकर]] भेटले. छान गोष्ट आहे, ते म्हणाले. एका मोठ्या माणसाला तुझी गोष्ट खूप आवडली आहे असे म्हणून ते बाबूरावांना [[नाथ माधव]] यांच्याकडे घेऊन गेले. नाथ माधवांनी अशाच रहस्यकथा लिही असे सुचवले. बाबूरावांनी मग लेखणी हाती घेतली, ती अखेरच्या श्वासापर्यंत खाली ठेवली नाही.