"जी.एन. जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४९:
 
==पहिले भावगीत==
‘रानारानांत गेली बाई शीळ गं, राया तुला रे काळवेळ नाही, ताळमेळ नाही’ असे म्हणणार्‍या एका प्रेमात पडलेल्या तरुणीचे हे मनोगत [[मेहेकर]]चे कवी [[ना.घ. देशपांडे]] यांनी लिहिले होते. जोशी यांनी ते निवडले व चाल लावून म्हणायला सुरुवात केली. एका कार्यक्रमात रमाकांत रूपजी यांनी ते ऐकले व त्याची रेकॉर्ड करण्याचे ठरले. या शीळेच्या गाण्यामुळेच जोशी यांचा एचएमव्हीत (हिज मास्टर्स व्हॉईस ग्रामोफोन कंपनीत) प्रवेश झाला व पुढे या शीळेनेच त्यांना वकिलीचे ज्ञान विसरण्यास भाग पाडले.
 
इ.स. १९३५ साली मराठीतल्या या पहिल्या भावगीताची ध्वनिमुद्रिका निघाली आणि महाराष्ट्राच्या घरांघरांत पोहोचली. तुफनतुफान खप असलेल्या या तबकडीमुळे एचएमव्हीचा मोठा आर्थिक फायदा झाला आणि जी.एन. जोशी यांचा एचएमव्हीत प्रवेश झाला.
 
एचएमव्हीत रमाकांत रुपजी या वरिष्ठ अधिकार्‍याने जोशी यांना प्रथम आणले व नंतर तर त्यांना मराठी व शास्त्रीय संगीताच्या विभागाचे अधिकारीच करून टाकले. जी.एन. जोशी, रमाकांत रुपजी व वसंतराव कामेरकर या अधिकार्‍यांच्या त्रयीने या भावगीतांच्या काळाला खरा आकार आणि आधार दिला. किती नव्या नव्या कलाकारांना त्यांनी हेरून प्रोत्साहन दिले व त्यांच्याकडून नेमकी रसिकांना आवडतील अशी गाणी करून घेतली त्याला तोडच नाही. शिवाय मराठी व हिंदी चित्रपटांच्या संगीताचे काम पुन्हा निराळे. अर्थात त्यात जोशी यांचा मुख्य वाटा नसला तरी स्टुडिओ उपलब्ध करून देणे, गायक व वादकांची रिहर्सलचे वेळापत्रक याचे ताळतंत्र पुन्हा त्यांनाच बघावे लागे. त्यात कलाकारांचा मूड सांभाळणे, त्यांना न दुखावणे ही मोठी जबाबदारी असायची. एचएमव्हीत ४० वर्षे जी. एन. जोशी यांनी हे काम लीलया सांभाळले. त्या काळात कलाकारांना लोकांसमोर येण्यासाठी एचएमव्ही हे एकच मोठे व्यासपीठ होते. त्यामुळे जी. एन. जोशी हे एचएमव्हीतले दादा अधिकारी समजले जात.
 
==जी.एन. जोशींच्या भावगीतांच्या सीडीज==
जी.एन. जोशींच्या जन्म शताब्दी वर्षात म्हणजे २००९ साली, एचएमव्हीने जोशींना मानवंदना देण्यासाठी कंपनीने त्यांच्या आवाजातील जुन्या ४३ भावगीतांच्या ‘स्वरगंगेच्या तीरी’ नावाचा दोन सीडींचा संच बाजारात आणला असून त्यात जोशी यांच्या आवाजातील फिरत, लयकारी, खटके-मुरके याचा आस्वाद रसिकांना घेता येतो.
 
==जी.एन. जोशी यांनी गायलेली सुरुवातीची अन्य लोकप्रिय भावगीते==