"द.पं. जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ११:
 
==द.पं. जोशी यांचे लेखन==
द.पं. जोशी यांचे स्वतंत्र, संपादित आणि अनुवादित असे १५ ग्रंथ आहेत. निरनिराळ्या वाङ्‌मयीन आणि संशोधनात्मक नियतकालिकांतून त्यांचे १००च्या वर लेख प्रकाशित झाले आहेत. यांशिवाय अनेक उर्दू, हिंदी, कथा, लेख यांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे, .
 
==द.पं. जोशी यांनी संपादित केलेली, अनुवादित केलेली आणि स्वतंत्रपणे लिहिलेली पुस्तके==
* इतिहास हैदराबादचा : राजकारण भारताचे - या विषयांवरील द.पं. जोशीलिखित १३ लेखांचा संग्रह.
* कर्तृत्वाचा महामेरू कै. के. व्ही. लक्ष्मणराव चरित्र व वाङ्‌मय : के.व्ही. लक्ष्मणराव यांचे चरित्र व त्यांचे तेलुगू, मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित झालेले साहित्य व त्याच बरोबर त्याचे समालोचन करणारा ग्रंथ.
* काळाच्या पडद्याआड खंड १, २, ३ : हैदराबादमधील इ.स. १९२० ते १९४० या काळात घडलेल्या आणि ’निजामविजय’ या हैदराबादमधील एकमेव मराठी वृत्तपत्रात छापून आलेल्या घटनांचा इतिहास. (संपादित)
* डॉ. एस.व्ही. केतकर - इंग्रजी चरित्र
* कै. चिंतामण नीलकंठ काकासाहेब जोशी : व्यक्ति आणि वाङ्‌मय
* दक्षिणा आणि प्रदक्षिणा : जोशी लिखित २२ साहित्यविषयक लेखांचा संग्रह. दक्षिणी भारतात राहणार्‍या मराठी लोकांच्या संस्कृतीचा इतिहास.
* पानगळीची सळसळ : कुर्तुल ऐन हैदर यांच्या उर्दू कथासंग्रहाचा मराठी अनुवाद
* पाषाणत्रय : १. हिंदी साहित्यिक नरेंद्र कोहली यांच्या अभ्युदय या हिंदी कादंबरीचा, २. अहिल्योद्धार या पुस्तकाचा आणि ३. उर्दू साहित्यकार जैलानी बानू यांच्या बशिराऽजंग - पाषाणवृष्टी कादंबरी व पत्थर का जिगर - पाषाणकोश या कथेचा मराठी अनुवाद.
* मिर्झा गालिब व सरदार जाफरी यांची निवडक पत्रे : या उर्दू कवींच्या व्यक्तिपरिचयाबरोबरच त्यांच्या पत्रंचा मराठी अनुवाद.
* समग्र कै. डॉ. ना. गो. नांदापूरकर : खंड १, २. (या पुनर्मुद्रित पुस्तकाची संपादित व जोशीलिखित प्रस्तावनेसहित नवी आवृत्ती
* समग्र सेतुमाधवराव पगडी : पगडींच्या ६५ इंग्रजी ग्रंथांचे संपादन, प्रकाशन आणि प्रस्तावनालेखन.
* लक्ष्मणास्वयंवर अर्थात विवेक विळास : कवी डिंभ या १७व्या शतकातील महानुभाव कवीच्या ३००० ओव्यांच्या काव्याची संपादित आवृत्ती, द. पं. जोशींलिखित २३ पानांच्या विस्तृत चिकित्सक प्रस्तावनेसह.
* व्यक्तिविशेष : हैदराबाद परिसरातील मराठी विचारवंत, संशोधक, साहित्यिक आणि राजकारणी व्यक्तींचा परिचय करून देणारे २८ लेख.
* हैदराबादची हस्तलिखिते (सूची)
* हैदराबाद : विमोचन आणि विसर्जन कै. प्राचार्य [[नरहर कुरुंदकर]] यांनी १९७८ मध्ये दिलेली व्याख्याने आणि अन्य लेख यांच्या आधारे सिद्ध केलेला ग्रंथ.
 
== पुरस्कार व गौरव ==
"https://mr.wikipedia.org/wiki/द.पं._जोशी" पासून हुडकले