"राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: राष्ट्रीय बंधुता परिषद ही ६ डिसेंबर १९८९रोजी स्थापन झालेल्या सम...
(काही फरक नाही)

२३:५३, १३ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

राष्ट्रीय बंधुता परिषद ही ६ डिसेंबर १९८९रोजी स्थापन झालेल्या सम्यक सहकार आंदोलन या संस्थेतून निर्माण झालेली एक साहित्यिक संस्था आहे. ‘गर्र्वसे कहो हम बंधू हैं’ हे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. संस्थेच्या महाराष्ट्रात अनेक शाखा आहेत. या बंधुता साहित्य परिषद नावाच्या संस्थेने आजवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन, आम्ही भारतीय साहित्य संमेलन, राजर्षी शाहू महाराज साहित्य संमेलन, कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलन, संत गाडगे महाराज साहित्य संमेलन, साने गुरुजी साहित्य संमेलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलन, तथागत भगवान गौतम बुद्ध साहित्य संमेलन, संत साहित्य साहित्य संमेलन, स्त्री साहित्य साहित्य संमेलन, विचारवेध साहित्य संमेलन, विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन, राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, आदी संमेलने भरवली आहेत.