"समरसता साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''समरसता साहित्य परिषद''' या संस्थेची महाराष्ट्र शाखा ही महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात [[समरसता साहित्य संमेलन]] भरवते. मुंबईत या संस्थेचे ’समरसता साहित्य परिषद प्रकाशन’ आहे, त्याद्वारे समरसता विषयक पुस्तके प्रकाशित केली जातात. ‘सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिक’ हे समरसता साहित्य परिषदेचे ब्रीदवाक्य आहे. समरसता हे एक जीवनमूल्य आहे असे सांगणारी ही संस्था आहे असे डॉ देवदात दाभोळकर म्हणतात. त्यांची प्रेरणा घेऊन या संस्थेची वाटचाल चालू आहे.
 
समरसता साहित्य परिषदेने आजवर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तीन दिवसांची समरसता साहित्य संमेलने भरवली आहेत. त्याशिवाय कविसंमेलने, परिसंवाद, व्याख्याने, कार्यशाळा, तसेच विद्यार्थी केंद्रबिंदू धरून त्यांच्या साहित्यिक जाणिवांना हळुवार साद घातली आणि बघता बघता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रतिसाद्मिळू लागला. विद्यार्थ्यांच्यातील सुप्त साहित्यिक गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही संस्था ‘कवितेकडून कवितेकडे’ हा उपक्रम चालवते. कवितेच्या स्पर्धा ठिकठिकाणी होतातच पण २०१४ सालापासून काव्य सादरीकरणाच्या सांघिक स्पर्धा होऊ लागल्या आहेत.
 
==’समरसता साहित्य परिषद प्रकाशन, मुंबई’ने प्रसिद्ध केलेली पुस्तके==