"साधना (अभिनेत्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय अभिनेत्री (१९४१-२०१५)
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: साधना, पूर्ण नाव साधना शिवदासानी नायर (जन्म : २ सप्टेंबर, इ.स. १९४१;...
(काही फरक नाही)

१६:१८, ३ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

साधना, पूर्ण नाव साधना शिवदासानी नायर (जन्म : २ सप्टेंबर, इ.स. १९४१; मृत्यू : २५ डिसेंबर, इ.स. २०१५)या एक हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. साधना यांचा जन्म कराची, पाकिस्तान (त्याकाळी सिंध, ब्रिटिश इंडिया)मध्ये झाला होता. प्रसिद्ध नृत्यांगना साधना बोस यांच्या नावावरून त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव साधना असे ठेवले होते.

सर्वप्रथम त्या राज कपूर यांच्या 'श्री ४२०' या चित्रपटातील 'मुड मुडके न देख मुड मुडके' या गाण्यात कोरस गर्लच्या रूपात झळकल्या होत्या. सन १९५८मध्ये 'अबना' या सिंधी चित्रपटात त्यांनी काम केले. या चित्रपटाचे मानधन म्हणून त्यांना एक रुपया मिळाला होता.

बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीच्या रूपात साधना आर.के. नायर यांच्या 'लव्ह इन शिमला' या चित्रपटातून झळकल्या. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान साधना आणि आर.के. नायर यांचे प्रेम जमले. पुढे त्यांनी विवाह केला. सन १९९५मध्ये अस्थमामुळे नायर यांचे निधन झाले

साधना यांनी जवळपास ३५ हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यांतले काही चित्रपट असे :-

  • अबना (सिंधी, १९५८)
  • असली नकली (१९६२)
  • अमानत (१९७५)
  • आप आए बहार आए (१९७१)
  • इंतकाम (१९६९)
  • एक फूल दो माली (१९६९)
  • एक मुसाफिर एक हसीना (१९६२)
  • गीता मेरा नाम (१९७२)
  • तुलसी (१९८५)
  • मेरा साया (१९६६)
  • लव्ह इन सिमला ()
  • वो कौन थी (१९६४)
  • श्री ४२०
  • हम दोनों (१९६१)