"चौल-रेवदंडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १७:
* एकवीरा देवीचे मंदिर : एकवीरा भगवती देवीचे मंदिरही बरेच जुने आहे. या मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजावरील तुळईवर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम शके १६७६ (इसवी सन १७५२) मध्ये केल्याचा एक संस्कृत लेख आहे.
* राजकोट : हा चौलचा भुईकोट विजापूरच्या आदिलशाहीने बांधलेला किल्ला होता. पुढे तो चौलच्या राजवटींबरोबर सत्ताबदल अनुभवत मराठ्यांकडे आला. पण पुढे-पुढे या किल्ल्याच्या आश्रयानेच मराठ्यांच्या साम्राज्यालाच उपद्रव होऊ लागल्याने पेशव्यांच्या आरमाराचे सुभेदार बाजीराव बेलोसे यांनी सुरुंग लावून हा राजकोट पाडला. या राजकोटाची तटबंदी, येथील शिबंदीची घरे, महाल-वाडे यांचे अवशेष आजही दिसतात.
* हमामखाना : हमामखाना म्हणजे मुसलमानी सत्ताधीशांनी बांधलेले शाही स्नानगृह होय. कमानींची रचना, भिंतीतच काढलेल्या खोल्या आणि या सार्‍यांवर असलेल्या चुन्यातील नक्षीकामाने या वास्तूला कलात्मक चेहरा आला आहे. या सार्‍यांतून फिरणारे पाण्याचे पाट, कारंजी, हौद तर ती शाही श्रीमंतीच पुढे आणतात. आज येथे पाण्याचा पुरवठा होत नसला तरी त्या सौंदर्यशाली रचना बघण्यासाठी हा हमामखान आजही भेट देण्यासारखा आहे.
 
* कलावंतिणींचा वाडा : मुसलमान राजवटील ही वास्तू चौलच्या सराई भागात आज उद्ध्वस्त अवस्थेत उभी आहे. या इमारतीच्या कमानी, सज्जे व घुमटाकार छतावरून हा कलावंतिणींच्या वाडा एकेकाळी किती सुंदर असेल याची कल्पना करता येते.
 
(अपूर्ण)