"चौल-रेवदंडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १५:
 
या मंदिराच्या सभामंडपात फरशीखाली पर्जन्य, वायू आणि अग्नी अशा नावांची तीन कुंडे आहेत. दुष्काळ पडला, पाऊस आटला की, ‘पर्जन्य’, वारा पडला-गदगदू लागले की ‘वायू’ आणि थंडी-गारठा वाढला की, उर्वरित ‘अग्नी’ कुंड उघडायचे. गावातील त्या-त्या गोष्टींची उणीव ही कुंडे भरून काढतात, अशी मान्यता आहे. पर्जन्यकुंड १७३१, १८७६ आणि १९४१ मध्ये उघडल्याच्या नोंदी आणि त्या-त्यावेळी चौलवर पाऊस पडल्याची माहिती मिळते.
* एकवीरा देवीचे मंदिर : एकवीरा भगवती देवीचे मंदिरही बरेच जुने आहे. या मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजावरील तुळईवर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम शके १६७६ (इसवी सन १७५२) मध्ये केल्याचा एक संस्कृत लेख आहे.
* राजकोट : हा चौलचा भुईकोट विजापूरच्या आदिलशाहीने बांधलेला किल्ला होता. पुढे तो चौलच्या राजवटींबरोबर सत्ताबदल अनुभवत मराठ्यांकडे आला. पण पुढे-पुढे या किल्ल्याच्या आश्रयानेच मराठ्यांच्या साम्राज्यालाच उपद्रव होऊ लागल्याने पेशव्यांच्या आरमाराचे सुभेदार बाजीराव बेलोसे यांनी सुरुंग लावून हा राजकोट पाडला. या राजकोटाची तटबंदी, येथील शिबंदीची घरे, महाल-वाडे यांचे अवशेष आजही दिसतात.