"गुरुचरित्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ १३:
==गद्य गुरुचरित्र==
अनेक जणांनी पद्यमय गुरुचरित्राचे गद्यात रूपांतर केले आहे. त्यांपैकी एक म्हणजे बाळ वामनभाई पंचभाई. यांनी लिहिलेल्या ’श्री गुरुचरित्र - जसे आहे तसे’ या पुस्तकात गुरुचरित्राच्या ५२ही अध्यायांतील कथासार साध्या सोप्या मराठीत शब्दबद्ध केले आहे.
 
डॉ. सीताराम गणेश देसाई (वैद्य) यांनी गुरुचरित्राच्या ओवीबद्ध पोथीचे गोष्टीरूपात गद्य निवेदन त्यांच्या’भावार्थ गुरुचरित्र’ या पुस्तकातून केले आहे. एकूण ५२ अध्याय यात कथारुपाने आले आहेत. श्रीगुरू नृसिंहसरस्वती यांचा भक्त नामकरणी हा गुरूंच्या दर्शनासाठी गाणगापूरला दर्शनासाठी निघाला असता सिद्धमुनी त्याला सृष्टीची उत्पत्ती, चार युगे यांची माहिती देऊन गुरुभक्ती, ब्रम्हा, विष्णू, महेश यांचा दत्त अवतार, श्रीपादवल्लभ यांचे चरित्र व गुरुमहिमा सांगणार्‍या अनेक कथा कथन करतात. त्या सर्व यात अगदी सोप्या भाषेत दिल्या आहेत.
 
त्यानंतर श्रीगुरुचरित्र व श्रीदत्त संप्रदाय, श्रीगुरुचरित्राचे लेखक, विविध पोथ्यांमधील फरक, साप्ताहवाचन पद्धती, वाचनाची फलश्रुती, गुरुगीतेचा भावार्थ, गुरुचरित्रातील कानडी पदांचा मराठी शब्दार्थ, श्रीरंगावधूटस्वामीविरचित दत्तबावनी, श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचित तीन दत्तस्तोत्रे व करूणात्रिपदी, श्रीनारदविरचित दत्तस्तोत्र, श्रीशंकराचार्याचे गुरुअष्टक, श्रीदत्तसंप्रदयाचा परिचय, काही प्रमुख दत्तक्षेत्रे आदींची माहिती त्यांनी यात दिली आहे.
 
==गुरुचरित्राच्या हस्तलिखित आवृत्त्या==