"तुषार आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: तुषार आपटे हा अमेरिकेत लॉस एंजेलिस येथे राहणारा एक मराठी तरुण सं...
(काही फरक नाही)

२२:४५, २१ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

तुषार आपटे हा अमेरिकेत लॉस एंजेलिस येथे राहणारा एक मराठी तरुण संगीतकार आहे.

कुटुंब

तुषारची आई मिनोती आपटे या शास्त्रज्ञ आहेत. शिवाय त्या स्वतः उत्तम नर्तकी आणि कलावंत आहेत. तुषारचे वडीलही ऑस्ट्रेलियातल्या सिडनी येथे मान्यवर शास्त्रीय गायकांमध्ये गणले जातात.

संगीताचे शिक्षण

तुषारने बारावीत असताना ‘संगीत’ या विषयात विशेष प्रावीण्य मिळविल्यानंतर सिडनी येथील ‘सिडनी कॉन्झरव्हेटरियन ऑफ म्युझिक’ येथे संगीताचे पुढचे शिक्षण घेतले. त्याने सिडनी विद्यापीठातून ‘बॅचलर ऑफ लिबरल स्टडीज’ तसेच ‘युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स’ येथून ‘मास्टर ऑफ जर्नालिझम’ही केले आहे.