"बाबुराव रामिष्टे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
माथाडी कामगारकामगारांचे झुंजार नेते व अखिल भारतीय माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस बाबुराव रामिष्टे (जन्म : इ.स. १९४०; निधन : २६ नोव्हेंबर, इ.स. २०१५) हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याचे रहिवासी होते. म्हसकरवाडी, पोस्ट धामणी, तालुका पाटण हे रामिष्टे यांचे जन्मगाव, तर काळगाव हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण पाटण येथेच झाले होते. पुढे उदरनिर्वाहासाठी ते मुंबईत आले. तेथे माथाडी कामगार म्हणून काम करत त्यांनी रात्रशाळेत अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ते माथाडी कामगारांचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जात. त्यांनी माथाडी कामगारांच्या अनेक प्रश्‍नांवर चळवळी केल्या. माथाडी कामगारांसाठी घरे आणि अन्य प्रश्‍नांवर लढा दिला. त्यासाठी त्यांनी सरकारला वेळोवेळी धारेवर धरले होते.
 
आंतरराष्ट्रीय बंदर लाभलेले मुंबई शहरातील घाऊक बाजारातील उलाढालीत माथाडी कामगारांचा फार मोलाचा वाटा असतो. या कष्टकरी वर्गाला संघटित करून त्याच्या अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडणारे कामगारनेते बाबुराव रामिष्टे यांनी तब्बल ४० वर्षे हे माथाडी कामगार संघटनेचे काम केले.