"लीला गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
| तळटीपा =
}}
 
लीला गांधी या एक मराठी नर्तकी, नृत्यदिग्दर्शक आणि मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत.
 
लीला गांधी यांनी. वयाच्या आठव्या वर्षापासून नृत्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. खेड्यापाड्यांत लावणीचे कार्यक्रम केले. मास्टर भगवान यांनी त्यांचे नृत्य कौशल्य हेरले आणि त्यांच्यामुळे लीलाताईंना 'रंगीला' या हिंदी चित्रपटात ब्रेक मिळाला. या चित्रपटामुळे मराठी चित्रसृष्टीचे दरवाजेही त्यांना खुले झाले. दिग्दर्शक अनंत माने यांनी 'सांगत्ये ऐका' या तमाशापटातील लावणी नृत्यांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली आणि त्यांच्या कारकिर्दीने तसेच लावणीनृत्यानेही देखणे वळण घेतले. या चित्रपटातील सर्व गाणी व त्यावरील नृत्ये गाजली.
 
मराठी चित्रपटात लावणी लोकप्रिय करण्यामध्ये लीला गांधींचा मोठा वाटा आहे. लावणी या लोककलेला लोकप्रियता, लोकाश्रय मिळावा, तिला प्रतिष्ठा मिळावी यासाठी त्या महाराष्ट्रभर फिरल्या. 'लीला गांधी नृत्यदर्शन' हा कार्यक्रम त्यांनी राज्यभर सादर केला. चित्रपटाप्रमाणे त्यांच्या या कार्यक्रमालाही उत्तम लोकप्रियता लाभली. चांगले स्टेज, राहाण्याच्या तारांकित सुविधा नसतानाही त्या केवळ सर्वसामान्यांपर्यंत लावणी पोहोचवण्यासाठी निष्ठेने कार्यक्रम करत राहिल्या. पुढे गुडघेदुखीमुळे त्यांचे कार्यक्रम थांबले.
 
लीलाताईंनी नृत्यांसोबत पंचविसाहून अधिक चित्रपटांत नायिका, सहनायिका म्हणूनही कामे केली. त्यांच्या भूमिकाही नावाजल्या गेल्या.
 
==लीला गांधी यांचे नृत्यदिग्दर्शन असलेल्या चित्रपटातील लावण्या==
* ऐन दुपारी, यमुना तीरी
* कुण्या गावाचं आलं पाखरू
* बुगडी माझी सांडली गं
 
 
 
==पुरस्कार==
* लीला गांधी यांना [[पी. सावळाराम]] यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ [[ठाणे]] महानगरपालिकेक्डून ’गंगाजमुना’ पुरस्कार आला (डिसेंबर २०१५)
* 'पैज' आणि 'कार्तिकी' या चित्रपटांतील भूमिकांतील अभिनयाबद्दल त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला.
* २०१२मध्ये त्यांना राज्य सरकारने व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.
 
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|गांधी, लीला]]