"राम बाळकृष्ण शेवाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४:
== जीवन ==
कयाधू नदीच्या काठावरील शेवाळ हे राम शेवाळकरांचे मूळ गाव. तिथूनच त्यांच्या घरून शेवाळकरांकडे साहित्याचा वसा आणि वारसा आला. त्यांचे मूळचे आडनाव धर्माधिकारी. कालांतराने अचलपुरास वस्तीला आल्यावर शेवाळकर झाले. गोपिका बाळकृष्ण शेवाळकर या त्यांच्या आई. वेदशास्त्रसंपन्न रामशास्त्री शेवाळकर हे राम शेवाळकरांचे पणजोबा, बाळकृष्ण काशीनाथ ऊर्फ भाऊसाहेब शेवाळकर हे त्यांचे वडील. त्यांनी पासष्ट वर्षे कीर्तनाने लोकांना मंत्रमुग्ध केले. अशा घराण्यात जन्मल्यामुळे राम शेवाळकरांना संस्कृत साहित्याची आवड लागली. त्यांच्यावर संस्कृत महाकाव्ये, मराठी संतसाहित्याच्या माध्यमातून वाङ्मयीन संस्कार झाले.<br />
राम शेवाळकरांचा जन्म [[मार्च २]], [[इ.स. १९३१|१९३१]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अमरावती जिल्हा|अमरावती जिल्ह्यामध्ये]] [[अचलपूर]] गावात झाला. पुढे त्यांनी [[नागपूर विद्यापीठ|नागपूर विद्यापीठातून]] [[संस्कृत भाषा|संस्कृत]] व [[मराठी भाषा|मराठीत]] एम.ए. केल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. [[वाशीम]] येथे शासकीय प्रशालेत ते शिक्षक होते. पुढे यवतमाळ महाविद्यालय, नांदेडातील पीपल्स कॉलेज, वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून शिकवले. या सुमारासच त्यांनी संस्कृतीविषयक साहित्यनिर्मितीही आरंभली.<br />
[[नागपूर विद्यापीठ|नागपूर विद्यापीठातून]] [[संस्कृत भाषा|संस्कृत]] व [[मराठी भाषा|मराठीत]] एम.ए. केल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. [[वाशीम]] येथे शासकीय प्रशालेत ते शिक्षक होते. पुढे यवतमाळ महाविद्यालय, नांदेडातील पीपल्स कॉलेज, वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून शिकवले. या सुमारासच त्यांनी संस्कृतीविषयक साहित्यनिर्मितीही आरंभली.<br />
[[इ.स. १९९४|१९९४]] साली [[गोवा|गोव्यात]] [[पणजी]] येथे भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरूजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा संस्थांच्या कामात शेवाळकरांचा सहभाग होता.
 
==अनुवाद==
प्रा. शेवाळकर यांनी अनेक ग्रंथांचे अनुवाद केले. महाकवी भास यांच्या नाट्यावर आधारित ' अग्निमित्र ' हे त्यांचे विशेष पुस्तक. याशिवाय अभिज्ञान शाकुंतल, भासाची भारतनाट्य, प्रतिज्ञायौगंधरायण, स्वप्नवासवदत्ता, मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय, कालिदासाची यक्षसृष्टी, चारुदत्त आणि शूद्रकृत मृच्छकटिक, त्रिवेणी हे अनुवादही मराठी-संस्कृतच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरणारे आहेत.
 
==व्याख्याने आणि ध्वनिफीती==
प्रा. शेवाळकरांच्या ध्वनिफिती दर्दी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. अत्यंत ओघवती भाषा या ज्ञानतपस्वींकडे होती. त्यामुळे त्यांनी आपल्या बोलण्यातून सगळ्यांवर भुरळ पाडली. महाभारतातील स्त्रीशक्ती, स्वातंत्र्यवीर सावरकर, योगेश्वर कृष्ण, सीता, दुर्योधन, रामायणातील राजकारण, विनोबा भावे, ज्ञानेश्वरी, अवसेचे चांदणे, कानडा तो विठ्ठलू, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वरांचा प्रतिभाविलास भाग १ आणि २. ज्ञानेश्वरांचा चित्विलासवाद, ज्ञानेश्वरांचा नारायणीयधर्म, पसायदान, समाधीसोहळा, ज्ञानेश्वरांचा भक्तीयोग भाग १ आणि २, अमृतसरिताः संस्कृत साहित्याचा आस्वादक प्रवाह, या त्यांच्या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवण ध्वनिफिती आहेत.
 
== प्रकाशित साहित्य ==