"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४८:
[[पुणे]] जिल्ह्यातील [[जुन्नर]] शहरानजीक वसलेल्या [[शिवनेरी]] या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये शिवाजीचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये शिवाजीची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली..<ref>टाइम्स ऑफ इंडिया [http://articles.timesofindia.indiatimes.com/2003-02-04/pune/27278977_1_shiv-jayanti-shiv-sena-mandals] (इंग्लिश मजकूर)</ref> त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७((वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध कॅलेडरांत वेगवेगळी तारीख दाखविली असते. <br>
एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले.
 
==शिवाजी जयंती==
भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथी नुसार व्यवहार होत असत. इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगेरिअन केलेंडरप्रमाणे व्यवहार होऊ लागले.
 
ग्रेगेरिअन केलेंडर भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात. महात्मा फुले, गांधी, डॉ. आंबेडकर, टिळक या सार्‍यांचा जन्म भारतात इंग्रजी केलेंडर लागू झाल्यावर झाला होता . त्यामुळे त्यांची जयंती तारखेने केली जाते . गांधीच्या, टिळकांच्या किंवा अगदी बाळ ठाकरेंच्या जन्म दाखल्यावर इंग्रजी तारीख असल्याने त्यांची जयंती इंग्रजी तारखेनुसार साजरी होते.
 
तुकाराम, बसवेश्वर, शिवाजी, गौतम बुद्ध या सार्‍यांचा जन्म भारतात इंग्रजी केलेंडर लागू करण्यापूर्वी झालेला आहे. त्यांच्या काळात सारे व्यवहार तिथीने करत असत. त्यांचे जन्मदिवस तिथीने साजरे होतात.
 
आज ज्या ग्रेगेरिअन केलेंडरने शिवाजीच्या जन्माची १९ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे, ते केलेंडर शिवाजीच्या वेळेला युरोपातसुद्धा प्रचलित नव्हते. इंग्रजांनी ग्रेगेरियन कॅलेंडर १७५२ साली स्वीकारले, तोपर्यंत ज्युलियन कॅलेंडर अधिकृत होते. ज्युूलिअन कालगणना व ग्रेगेरिअन कालगणना यांच्यात १७०० सालपर्यंत १० दिवसांचा तर १७०० सालापासून पुढे ११ दिवसांचा फरक येतो. (ज्युलियन कॅलेंडर पुढे गेले होते.) त्यामुळे ग्रेगेरियन केलेंडरनुसार निर्धारित १९ फेब्रुवारी ही तारीख १० - ११ दिवसांनी चुकते. कोणती कालगणना शिवाजीच्या जन्मावेळी प्रचलित होती त्यानुसारमुळे शिवाजी जयंती तिथीनुसार साजरी व्हावी असे काही जणांना वाटते. सरकरला असे करणे अडचणीचे आहे म्हणून सरकारी जयंती तारखेनुसार असते.
 
शिवाजीचा जन्म १६२७ साली झाला अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा जयंतीची तिथी वैशाख शुद्ध तृतीया येत असे. जेव्हा जन्मसाल १६३० नक्की झाले तेव्हा तिथी फाल्गुन वद्य तृतीया येऊ लागली. शिवाजीच्या जन्मावेळी जर ग्रेगरियन कॅलेंडर असते तर १६३० सालची फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारीला आली असती. म्हणून, २००१ सालापासून १९ फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते.
 
=== शहाजीराजे ===