"प्रभाकर जोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७:
 
==व्हायोलिनवादनाचे शिक्षण आणि कार्यक्रम==
त्यांनी [[गजाननराव जोशी]] आणि नाराणराव मारुलीकर यांच्याकडून वयाच्या ५व्या-६व्या वर्षापासून व्हायोलिनगायन शिकायला सुरुवात केली. प्रभाकर जोग यांचे भाऊ वामनराव जोग हे आकाशवाणीवर व्हायोलिनवादक म्हणून नोकरी करत आणि घरी व्हायोलिनचे वर्ग घेत..प्रभाकर जोग आसपास रेंगाळून संगीताचा आस्वाद घेतच मोठे झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी त्यांनी व्हायोलिनचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातील वाड्यांमधून त्यांनी सव्वा रुपया आणि नारळ या बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम केले. एस.पी. कोलेजच्या मैदानात भरलेल्या स्नेहसंमेलनात व्हायोलिन वाजवत असताना मदानापलीकडे राहणार्‍या [[सुधीर फडके]] यांनी ते ऐकले आणि प्रभाकर जोगांना भेटायला बोलावले. पुढे ते संगीत दिग्दर्शक [[सुधीर फडके]] यांचे साहाय्यक झाले. गीतरामायणाच्या सुमारे ५०० कार्यक्रमांना प्रभाकर जोग यांची साथ होती.
 
प्रभाकर जोगांची मोठ्या आकारमानाच्या व्हायोलिनशी चाललेली झटापट पाहून त्यांच्या आजीने त्याना अडीचशे रुपयांचे एक छोटे व्हायोलिन आणून दिले. प्रभाकर जोग या वाद्यावर हळूहळू प्रभुत्व मिळवत गेले. कशाचीही चिंता नसताना वडिलांना विशाखापट्टणम इथल्या एका साखर कारखान्यात बोलावणे आले. ते तेथे गेल्यानंतर कुटुंब तात्पुरतेे पुण्यात आले. दुसर्‍या महायुद्धाच्या त्या दिवसांमध्ये ब्रिटिशांच्या एका भरधाव गाडीने वडिलांना उडवले. इ,स, १९४४ मधील दिवाळीच्या तोंडावर तो अपघात झाला. दोन दिवसांनी आलेल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वडील गेले. त्यांच्या जाण्याने एका रात्रीत जोग कुटुंबाचे दैव फिरले. मोठे बंधू वामनराव जी शिकवणी घेत तिचे थोडेफार उत्पन्न होते. यानंतर जगण्यासाठी लढाई सुरू झाली. घर चालवण्यासाठी प्रत्येक जण हातपाय मारू लागला. प्रभाकर जोगांच्या एका भावाने भाजीचे दुकान टाकले. सकाळी लवकर उठून भावाला त्याच्या भाजीच्या दुकानात मदत करणें, दुधाचा रतीब घालणे, त्यानंतर धाकट्याभावासह भावे स्कूल शाळेत जाणे आणि अधूनमधून संभाजी पार्कात काकड्या विकणे एवढे उद्योग ते करू लागले. पुण्यात तेव्हा मुदलियार यांचा एक छापखाना होता, तिथल्या कागदांपासून वह्य़ा करून विकायचे उद्योगही जोगांनी केले. एवढे सगळे करून परीक्षेत पहिल्या पाचात त्यांचा व्हायोलिनवादन सुरूच होते.
 
वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी त्यांनी व्हायोलिनचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातील वाड्यांमधून त्यांनी सव्वा रुपया आणि नारळ या बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम केले. एस.पी. कोलेजच्या मैदानात भरलेल्या स्नेहसंमेलनात व्हायोलिन वाजवत असताना मदानापलीकडे राहणार्‍या [[सुधीर फडके]] यांनी ते ऐकले आणि प्रभाकर जोगांना भेटायला बोलावले. पुढे ते संगीत दिग्दर्शक [[सुधीर फडके]] यांचे साहाय्यक झाले. गीतरामायणाच्या सुमारे ५०० कार्यक्रमांना प्रभाकर जोग यांची साथ होती.
 
==सांगीतिक कारकीर्द==