"अवतार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
अवतार ही एक हिंदू धर्मातील कल्पना आहे. तिच्यानुसार एरवी स्वर्गात राहणारे देव एकतर अर्ध-देव रूपात येतात किंवा पृथ्वीवर मनुष्यरूपात जन्म घेतात.
 
डार्विनचा उत्क्रांतिवाद : विष्णूचे दहा अवतार आणि डार्विनचा उत्क्रांतिवाद यांमधले साधर्म्य अचंबा करण्यासारखे आहे. पूर्णपणे सुधारलेला माणूस उत्क्रांत होण्याआधी जलचर प्राणी, उभयचर प्राणी, हिंस्र प्राणी व रानटी माणूस हे पृथ्वीवर आले. विष्णूचे अवतार तसेच आहेत. स्त्रीच्या गर्भाशयात वाढणारे मूलही अशाच अवस्थांमधून जाते. डार्विनच्या समकालीन असलेल्या अर्न्स्ट हेकल (१८३४-१९१९) या प्राणिशास्त्रज्ञाने 'ओंटोजेनी रीकॅपिच्युलेट्स फायलोजेनी' नावाचा सिद्धान्त प्रस्तुत केला होता. त्या सिद्धान्तानुसार मादीच्या गर्भात असलेला भ्रूण उत्क्रांतिवादात सांगितलेल्या पायऱ्या-पायऱ्यांनी वाढतो. हा सिद्धान्त मांडण्यासाठी अर्न्स्टने अनेक जीवांच्या गर्भावस्थेतील छायाचित्रे सादर केली होती. दुर्दैवाने काहीतरी गफलत होऊन कुत्रा, कोंबडा व माणूस यांच्या गर्भावस्था दाखवताना एकच चित्र तीनदा छापले गेले. या सिद्धान्ताचा शोधनिबंध वाचताना या चुका टीकाकारांच्या लक्षात आल्या, आणि सिद्धान्तावर 'चुकीचा सिद्धान्त' असा शिक्का बसला. अशा प्रकारे एक महान वैज्ञानिक लोकसन्मानाला अपात्र ठरला. अर्न्स्ट हेकलने तयार केलेले इकाॅलाॅजी, फायलोजेनी हे शब्द मात्र भाषेत प्रचलित झाले. अर्न्स्टने 'प्रोटिस्टा' नावाचा एक सजीवांचा गटही शोधला होता.
 
==विष्णुदेवाचे दहा अवतार (हे सर्व प्राणिरूपात, अर्ध-मानवी रूपात, अप्रगल्भ मानवीरूपात किंवा पूर्ण मनुष्यरूपात आहेत).==
"https://mr.wikipedia.org/wiki/अवतार" पासून हुडकले