"उम्स्वाती तिसरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
}}
'''उम्स्वाती तिसरा''' ([[स्वाती भाषा|स्वाती]]: Mswati III; जन्म: १९ एप्रिल १९६८) हा [[दक्षिण आफ्रिका (प्रदेश)|दक्षिण]] आफ्रिका भागातील [[स्वाझीलँड]] देशाचा राजा व स्वाझीलँड शाही परिवाराचा कुटुंबप्रमुख आहे. स्वाझीलँडच्या संविधानाने राजाला राज्यकारभाराचे सर्व अधिकार दिले असून पंतप्रधान व मंत्रीमंडळाची निवड उम्स्वाती करतो. सर्व राज्यहक्क असलेला तो आफ्रिका खंडामधील अखेरचा विद्यमान राजा आहे.
 
मस्वाती यांचे वडील राजे सोभुजा यांना तब्बल १२५ बायका होत्या. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मस्वाती यांनी मोठ्या कुटुंबाची परंपरा सुरू ठेवली आहे. अवघ्या ४७ वर्षांच्या मस्वातींनी आतापर्यंत १५ लग्नं केली आहेत. २०१३मध्ये त्यांनी १८ वर्षांच्या मुलीसोबत १५वा विवाह केला आहे. यांना किमान १५ राण्या व ३० मुले आहेत. आपल्या राण्यांसाठी त्यांनी १३ अलिशान महाल बांधले आहेत.
 
२००९ साली प्रसिद्ध करण्यात आलेल्या फोर्ब्सच्या यादीनुसार, मस्वाती हे जगातील सर्वात श्रीमंत राजांपैकी एक आहेत. त्यांच्याकडं ६२ अलिशान गाड्यांचा ताफा असून त्यात पाच लाख डॉलरच्या मेबेक कारचाही समावेश आहे. या गाड्यांचे फोटो काढण्यास बंदी आहे.
 
स्वाझीलँडची जनता दारिद्र्यामध्ये जीवन कंठत असताना उम्स्वातीकडे मात्र प्रचंड प्रमाणावर संपत्ती असून त्याचे राहणीमान आलिशान व उधळ्या स्वरूपाचे आहे. २०१४ सालच्या राष्ट्रीय अर्थसंकल्पामध्ये संसदेने उम्स्वाती परिवाराच्या खर्चासाठी प्रतिवर्ष ६१ दशलक्ष [[अमेरिकन डॉलर]]ची तरतूद केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=King of impoverished Swaziland increases household budget to $61m|दुवा=http://www.theguardian.com/world/2014/may/14/king-mswati-iii-swaziland-increases-household-budget|ॲक्सेसदिनांक=१३ जानेवारी २०१५}}</ref> उम्स्वातीने स्वाझीलँडमध्ये मोठ्या प्रमाणावर [[मानवी हक्क]]ांचे उल्लंघन केल्याची वृत्ते देखील प्रकाशित झाली आहेत.
 
==हे सुद्धा पहा==
* [[जगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी]]
 
{{संदर्भनोंदी}}