"मीना वांगीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मीना वांगीकर (जन्म : धारवाड, इ.स.१९५०; मृत्यू : पुणे, २८ ऑक्टोबर, इ.स....
(काही फरक नाही)

१४:४५, ३० ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

मीना वांगीकर (जन्म : धारवाड, इ.स.१९५०; मृत्यू : पुणे, २८ ऑक्टोबर, इ.स. २०१५) या मराठी-कन्‍नड अनुवाद करणार्‍या एक लेखिका होत्या. मातृभाषा कन्नड असताना त्यांनी मराठीवर प्रभुत्व मिळवले होते.

त्या इंग्रजी व कन्नड भाषेत लिहिणारे लेखक व्ही.एम. इनामदार यांच्या कन्या होत्या.

मीना वांगीकर यांची कन्नड/मराठी पुस्तके

  • रावबहादूर आर. जी. कुलकर्णी यांचेा ’धूमकेतू‘ (कन्नडमधून मराठीत)
  • प्र-प्रवासाचा फ-फजितीचा (स्वतंत्र)
  • व्यासराय बल्लाळ यांचे ’साहित्य अकादमी पुरस्कार‘प्राप्त ’बंड‘ (कानडीतून मराठीत)
  • अनंतराव कुलकर्णीलिखित "मी जेनी‘ (मराठीतून कन्‍नड)
  • मूकज्जी (कानडीतून मराठीत) : मूळ डॉ. शिवराम कारंथ याचेा ’ज्ञानपीठ पुरस्कार‘प्राप्त ’मूकज्जिय कनसुगळू’ ही कादंबरी
  • मोह पश्‍चिमेचा (स्वतंत्र)
  • ययाती वि.स. खांडेकर यांची ’ययाती’ (मराठीतून कानडीत)
  • स्त्री माझे नाव असे (स्वतंत्र)

मीना वांगीकर यांना मिळालेलेपुरस्कार

  • पुण्यातील मराठी-कन्‍नड स्नेहसंवर्ध्न केंद्राचा पुरस्कार
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा स. ह. मोडक पुरस्कार
  • मुंबई कर्नाटक संघातर्फे वरदराज आचार्य पुरस्कार (१९९४)