"दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९८१ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
डॉ. '''दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे''' ([[कन्नड भाषा|कन्नड]]: ದತ್ತಾತ್ರೇಯ ರಾಮಚಂದ್ರ ಬೇಂದ್ರೆ ; [[रोमन लिपी]]: ''Dattatreya Ramachandra Bendre'') (३१ जानेवारी, इ.स. १८९६; [[धारवाड]], [[ब्रिटिश भारत]] - २१ ऑक्टोबर, इ.स. १९८१; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) हे [[कन्नड भाषा|कन्नड भाषेतील]] ख्यातनाम कवी होते. ते ''अंबिकातनयदत्त'' (''अंबिकेचा पुत्र - दत्त'') या टोपणनावाने लिहीत. कन्नड कविता व नाटकांशिवाय त्यानी मराठी साहित्यकृतींचे कन्नड भाषेत अनुवादही केले. ''नवोदय युगातील'' कन्नड काव्यातले त्यांचे योगदान [[पद्मश्री पुरस्कार]] (इ.स. १९६८) व [[ज्ञानपीठ पुरस्कार]] (इ.स. १९७४) देऊन गौरवण्यात आले.
 
==श्लिषण==
द.रा. बेंद्रे यांची मातृभाषा मराठी होती. त्यांनी १९१४ ते १९१८ या काळात पुण्यातील [[फर्ग्युसन कॉलेज]]ातून पदवी घेतली. १९१६ साली बेंद्रे वीस वर्षांचे झाले या काळात त्यांची कविप्रतिभा कन्‍नड, मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या चारही भाषांतून चौफेर वाहू लागली. १९१६ मध्ये बेंद्रे यांनी फर्ग्युसन कॉलेजात असताना मुरली नावाचे हस्तलिखित कन्नड-मराठी मित्रांच्या मदतीने दोन्ही भाषांत प्रसिद्ध केले. ही त्यांच्या साहित्यसेवेची सुरुवात मानली जाते.१९१८ मध्ये संस्कृत आणि इंग्रजी विषय घेऊन बेंद्रे बी.ए. झाले.
 
पुण्यात द.रा. बेंद्रे यांचे वास्तव्य त्यांचे काका बंडोपंत बेंद्रे यांचेकडे होते. तेथे राहून १९३३ ते १९३५ या दरम्यान्बेंद्रे एम.ए. झालेआणिपुढे १९४४ ते १९५६ अशी बारा वर्षे सोलापुरातील दयानंद महाविद्यालयात कानडीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत झाले.
 
==बेंद्रे यांची साहित्यसेवा==
पुण्यात असताना बेंद्रे यांच्या पुढाकाराने १९१५ साली रविकिरण मंडल व शारदा मंडळ या नावाने मित्रमंडळांची स्थापना झाली. यामंडळाट्देश-विदेशांतील साहित्य्व काव्य यांची चर्चा, चिंतन व मनन होत असे.
 
पुढे धारवाडला आल्यावर बेंद्रे यांनी तेथेही ’गेळेवर गुंपू’ची म्हणजे मित्र मंडळाची स्थापना केली. कन्नड साहित्यामध्ये या मंडळाला आजही मानाचे स्थान आहे.
 
इ.स. १९५९ साली बेंद्रे यांनी म्हैसूर विद्यापीठात मराठी साहित्याविषयी तीन व्याख्याने दिली. अमृतानुभव, व चांगदेव पासष्टी यांचे कानडी भाषेत अनुवाद केले. मराठी लोकांना आधुनिक कन्‍नड काव्य, आणि विनोद यांचा परिचय करून दिला.
 
==मराठी पुस्तके==
* के.व्ही. अय्यर यांच्या ’शांतता’ या कादंबरीचा मराठी अनुवाद (१९६५)
* गीता जागरण (व्याख्यान, १९७६)
* विठ्ठल पांडुरंग (कविता संग्रह, १९८४)
* विठ्ठल संप्रदाय (व्याख्यान, १९६०)
* संत महंतांचा पूर्ण शंभू विठ्ठल (तीन व्याख्याने, १९८०)
* संवाद (कविता संग्रह, १९६५)
 
== प्रकाशित साहित्य ==
Line ६८ ⟶ ८८:
* [[पद्मश्री पुरस्कार]] - इ.स. १९६८
* [[ज्ञानपीठ पुरस्कार]] - इ.स. १९७४
* [[न.चिं .केळकर]] पुरस्कार
 
== बाह्य दुवे ==