"पुष्पलता रानडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:
 
==पुष्पलताबाईंचे दातृत्व==
पुष्पलता रानडे यांनी पन्नास वर्षांच्या काळात हजारो कीर्तने करून त्यांतून मिळालेल्या पैशातून अनेक सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक संस्थाना उभारणीसाठी व संवर्धनासाठी लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या. नव्वद वर्षांचे कृतार्थ जीवन जगून त्या उभ्या महाराष्ट्राला लेखिका, कवयित्री व कीर्तनकार म्हणून परिचित झाल्या.
 
कर्तृत्व, वकृत्व ह्यांबरोबरच पुष्पलताबाई त्यांच्या सहज दातृत्वामुळे जनमानसात मान्यता पावल्या. त्यांनी आपल्या धनसंचयाचा समाजऋणाच्या भावनेतून उत्तम विनियोग केला. आपले पती राजाभाऊ रानडे यांच्या निधनानंतर सर्वसामान्य स्त्रीप्रमाणे हताश होऊन न बसता स्थावर आणि जंगमाची योग्य निरवानिरव करून त्यातून प्राप्त झालेल्या धनाचा सदुपयोग करण्याचे व्रतच पुष्पलता रानडे यांनी घेतले होते.
ओळ २१:
वयोमानपरत्वे आता आपण कीर्तनांतून धनसंचय करू शकणार नाही हे लक्षात आल्यावर दानधर्म हेच व्रत असल्यामुळे, ते केल्याशिवाय जीवन व्यर्थ आहे ह्या जाणिवेने त्यांनी पुण्यातील लक्ष्मीरोडवरील ऐंशी-नव्वद वर्षांपूर्वीचे पेशवाई थाटाचे आपले ऐसपैस घर विकून व जवळील सर्व मौल्यवान वस्तूंच्या विक्रीतून मोठी रक्कम जमा केली व झपाटल्याप्रमाणे स्वतःला मुलबाळ नसल्यामुळे अनेक संस्थाना अपत्यवत भावनेने योग्यता आणि गरज पाहून लहान-मोठ्या देणग्या देण्याचा सपाटा लावला.
 
सदाशिव पेठेत एक सदनिका व रोजच्या दैनंदिन उपजीविकेपुरता पैसा जवळ ठेवून बाकी सर्व रक्कम त्यांनी समाजकार्यासाठी मुक्तहस्ते वापरली. वास्तविक गरजू संस्था देणगीसाठी धनवंतांच्या शोधात असतात; पण येथे पुष्पलाताबाई सत्पात्र संस्थांच्या शोधात राहत व व्यवहारकुशलतेने एखादी संस्था जसे कार्य करेल तसे एकटीच्या हिमतीवर करत.
 
==मृत्युपत्र==
पुढे पुढे पुष्पलताबाईंची दान-धर्माची ऊर्मी एवढी वाढली की आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांना आवर घालावा लागला, व जो काही दानधर्म करायचा आहे तो आता इच्छापत्राद्वारे तुमच्या मृत्यूनंतर करावा अशी जाणीव त्यांना द्यावी लागली. जीवनभर आणि आपल्या मृत्युपत्राद्वारे जीवनपश्चात त्यांनी आपली पै अन्‌ पैची सर्व मालमत्ता कोणताही अपवाद न ठेवता फक्त सामाजिक पुरस्कार व शिष्यवृय्यींसाठीच व्यतीत करावी अशी उत्तम व्यवस्था करून ठेवून समाजाला एक उद्बोधक आदर्श घालून दिला.
 
नव्वद वर्षांचे कृतार्थ जीवन जगणार्‍या पुष्पलता रानडे या उभ्या महाराष्ट्राला लेखिका, कवयित्री, दानवीर व कीर्तनकार म्हणून परिचित झाल्या.
 
== पुष्पलता रानडे यांनी लिहिलेली पुस्तके ==
 
* आठवणीच्या हिंदोळ्यावर
 
* कीर्तन कमल
== पुस्तके ==
* गजरा
* गाऊ त्यांच्या आरती
* स्मृतिगंध
 
== स्मरणार्थ दिले जाणारे पुरस्कार ==
प्रत्येकी पन्‍नास हजार ते दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते.
* कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे जिद्द पुरस्कार
* कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला संशोधन पुरस्कार
* कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला साहस पुरस्कार
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद|मसापतर्फे]] उत्कृष्ट आत्मचरित्रासाठी दिला जाणारा कीर्तन संजीवनी [[पुष्पलता रानडे]] पुरस्कृत लक्ष्मीबाई टिळक वार्षिक पुरस्कार
* कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे विशेष कलागौरव पुरस्कार
* कीर्तन संजीवनी’ पुष्पलता रानडे विशेष गौरव सन्मान
* कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे सेवागौरव पुरस्कार
 
==पुरस्कारांचे आजवरचे मानकरी==
===जिद्द पुरस्काराचे मानकरी===
* आकांक्षा व आनंद देशपांडे
===संशोधन पुरस्काराचे मानकरी===
* डॉ. सुमन सहाय, डॉ. सरोज घासकडवी, डॉ. नंदिनी भोजराज
===साहस पुरस्काराचे मानकरी===
* रितू बिहाणी, सुरेश रानडे, जयश्री रानडे, अॅडव्होकेट फ्लेव्हिया अॅग्नेस, उमाताई पवार, हरमाला गुप्ता
===लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार===
* हुमान धायगुडे यांना
===विशेष कलागौरव पुरस्कार===
* भारूड सम्राज्ञी पद्मजा कुलकर्णी यांना
===विशेष गौरव सन्मान===
* ह.भ.प. [[उद्धवबुवा जावडेकर]], गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष कृ.गो. धर्माधिकारी
===सेवागौरव पुरस्कार===
* रुग्णमित्र अरुण कोंडेजकर यांना
 
 
 
 
 
 
 
 
==पुष्पलता रानडे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* जगदगुरू शंकराच्यार्यानी आदर्श कीर्तनकार म्हणून त्यांचा गौरव केला.
* गोवा कला अकादमीतर्फे "कीर्तन संजीवनी" ही उपाधी त्यांना देण्यात आली.
* पुष्पलता रानडे यांच्या जीवनावर आधारित "तेजशलाका' हा माहितीपट निघाला आहे.
* तसेच इतरही अनेक मानसन्मान त्यांना लाभले.