"गाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६९:
हिंदू कधीही गोमांस भक्षण करीत नव्हते असा दावा सरसकट केला जातो. मात्र हा दावा एस.एल. सागर यांनी ’हिंदूंनी केलेले गोमांसभक्षण’ या पुस्तकात खोडून काढण्याचा प्रयत्‍न केला आहे. हे सांगण्यासाठी त्यांनी वैदिक काळापासून गोमांस भक्षण करण्यात येत असल्याचे पुरावे दिले आहेत. उपनिषद काळ, रामायण काळ, महाभारत काळ, सूत्र काळ, स्मृति काळ, पुराण काळ, बौद्ध काळ, मध्य काळ आणि आधुनिक काळ या सर्व काळांत हिंदू गोमांस भक्षण करीत होते, असे लेखक स्वतंत्र प्रकरणांतून सांगतात. गोरक्षा आंदोलनावरही पुस्तकात चर्चा केली आहे. हिंदूंनी गोमांस खाणे का सोडले या प्रश्नाच्या उत्तराचा त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्‍न केला आहे. गोमांस भक्षणासंबंधीच्या निरनिराळ्या कहाण्यांचाही समावेश पुस्तकात केला आहे.
 
या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रमिला बोरकर यांनी केला आहे. हे मराठी पुस्तक पुण्याच्या सुगावा प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.
 
 
==गाईचे अर्थशास्त्र (पुस्तक)==
भारतातील केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेली गोवंश हत्त्याबंदी कशी चुकीची आहे, ते या पुस्तकातून मांडण्यात आले आहे. केंद्र सरकारने जेव्हा गोहत्त्याबंदीचा विचार केला तेव्हा त्या पार्श्वबूमीवर प्रा. [[वि.म. दांडेकर]] यांनी लिहिलेल्या लेखांचे संकल या पुस्तकात आहे. . पुस्तकाचे प्रकाशक - पुण्याचे सुगावा प्रकाशन.
 
==हेही पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/गाय" पासून हुडकले