"विनायक दामोदर सावरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४:
{{जाणकार}}
 
सावरकरांचा जन्म [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्यातील]] भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना [[गणेश दामोदर सावरकर|बाबाराव]] हे मोठे आणि [[नारायणराव सावरकर|नारायणराव]] हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नीपत्‍नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील [[इ.स. १८९९]]च्या प्लेगला बळी पडले.
 
सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. [[वक्तृत्व]], [[जयोऽस्तुते श्री महन्मंगले|काव्यरचना]] ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला [[स्वदेशीचा फटका]], [[जयोऽस्तुते श्री महन्मंगले|स्वतंत्रतेचे स्तोत्र]] ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. [[चाफेकरबंधूं|चाफेकरबंधूंना]] फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली [[कुलदेवता]] भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.
ओळ ४८:
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.
 
अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लीम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. [[विठ्ठलभाई पटेल]], [[रंगस्वामी अय्यंगार]] यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळेप्रयत्‍नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली.
 
अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर - असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजक्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्नप्रयत्‍न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर - अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात.
 
==सावरकरांचे जात्युच्छेदन==
ओळ ५६:
अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्ध केले (१९२४ जाने.६<ref>http://www.savarkarsmarak.com/chronology_m.php</ref>) . हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्‍नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य (१९३०नोव्हें )<ref>http://www.savarkar.org/mr/समाजसुधारणा/जात्युच्छेदक-निबंध + http://www.savarkarsmarak.com/chronology_m.php</ref> जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली.<ref>http://www.savarkar.org/mr/समाजसुधारणा/जात्युच्छेदक-निबंध वेबसाईट दिनांक २६ जुलै २०१२ १४-३५ वाजता पाहिले</ref> स्वकीयांतील जातीयतेवरपण निर्भीड टीका केली.
 
त्यांनी रत्नागिरीमधीलरत्‍नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले.<ref name="vishesh.maayboli.com">http://vishesh.maayboli.com/node/55 मायबोली हितगुज दिवाळी अंक २००८ जात्युच्छेदन आणि हिंदुत्व : सावरकर, संघ आणि शिवसेना. -लेखक चिन्या १९८५( डॉ.चिन्मय कुलकर्णी) ही वेबसाईट २६ जुलै २०१२ रोजी जशी पाहिली</ref>
 
जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. [[रत्‍नागिरी]] येथे त्यांनी [[पतितपावन मंदिर]] स्थापन केले, या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ [[आंतरजातीय विवाह]]ही त्यांनी लावून दिले.<ref name="vishesh.maayboli.com"/><ref>http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-freedam-fighter-sawarkar-social-change-program-3330764.html</ref>
 
==गाय हा एक उपयुक्त पशू आहे.. सावरकर==
वीर सावरकरांचे या बाबतीत झणझणीत विचार आहेत. ते लिहितात.. ‘मायासृष्टीत जोवर मनुष्य आहे आणि गाय, बल पशू आहे, तोवर माणसाने त्याच्याहून सर्व गुणांत हीन असलेल्या पशूस देव मानणे म्हणजे मनुष्यास पशूहून नीच मानण्यासारखे आहे. गाढवाने पाहिजे तर त्याहून श्रेष्ठ पशू असलेल्या गाईस देव मानावे; मनुष्याने तसे मानण्याचा गाढवपणा करू नये. ..कोणत्याही गोष्टीत ती धर्म आहे असे पोथीत सांगितले आहे, म्हणूनच तसे डोळे मिटून मानण्याची पोथीनिष्ठ आंधळी भावना आता झपाटय़ाने मावळत आहे आणि ती मावळत जावी हेच आता मनुष्याच्या प्रगतीस अत्यंत आवश्यक आहे.
 
एक वेळ राष्ट्रात थोडी गोहत्या झाली तरी चालेल, पण उभ्या राष्ट्राची बुद्धिहत्या होता कामा नये. यास्तव गाय वा बैल हे पशू आपल्या कृषिप्रधान देशात मनुष्यहितास अत्यंत उपकारक आहेत इतकेच सिद्ध करून, आणि त्या पशूचा उपयोग राष्ट्रास ज्या प्रमाणात, नि ज्या प्रकारे होईल, त्या प्रमाणात नि त्या प्रकारे पशू म्हणूनच जोपासना करू म्हणाल, तरच ते राष्ट्राच्या निभ्रेळ हिताचे होईल. पण त्या हेतूने गाय ही देव आहे कारण पोथीत तिची पूजा करणे हा धर्म आहे इत्यादी थापा माराल, तर त्यावर जरी राष्ट्राने यापुढेही विश्वास ठेवला नि गोरक्षण थोडेसे अधिक झाले, तरीही त्या पोथीजात प्रवृत्तीला उत्तेजन देण्याचे जे अपकार्य त्यायोगे करावे लागते त्याचे परिणाम राष्ट्राची शतपटीने अधिक हानी करील.’ (संपादित लेख – ‘गाय- एक उपयुक्त पशू’: वि. दा. सावरकर )
 
===एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन===
Line २३६ ⟶ २४१:
* साटम, दौलत मुरारी १९७०. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर , साटम प्रकाशन, मुंबई
* [[बाळाराव सावरकर|सावरकर, बाळाराव]] (संकलक) १९६९. वीर सावरकर आणि गांधीजी | वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
* --?--१९७२. हिंदुसमाज संरक्षक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर (रत्नागिरीरत्‍नागिरी पर्व) | वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
* --?--१९७५. स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु महासभापर्व भाग-१ (जून १९३७ ते डिसेंबर १९४०) । वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
* --?--१९७६. स्वातंत्र्यवीर सावरकर अखंड हिंदुस्थान लढा पर्व
Line ३१९ ⟶ ३२४:
* [[सावरकरांचे समाजकार्य सत्य आणि विपर्यास - शेषराव मोरे]]
* [[सावरकरांचा बुद्धिवाद एक चिकित्सक अभ्यास - शेषराव मोरे]]
* [[रत्नागिरीरत्‍नागिरी पर्व - आचार्य बाळाराव सावरकर]]
* [[हिंदुसभा पर्व खंड १ - आचार्य बाळाराव सावरकर]]
* [[हिंदुसभा पर्व खंड २ - आचार्य बाळाराव सावरकर]]