"प्रभाकर जोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
प्रभाकर जोग (जन्म : [[डिसेंबर २५]], [[इ.स. १९३२]]) हे महाराष्ट्रातले एक व्हायोलिनवादक आहेत. त्यांनी [[गजाननराव जोशी]] आणि नाराणराव मारुलीकर यांच्या कडून वयाच्या ५व्या-६व्या वर्षापासून व्हायोलिन शिकायला सुरुवात केली. प्रभाकर जोग यांचे भाऊ वामनराव जोग हे आकाशवाणीवर व्हायोलिनवादक म्हणून नोकरी करत आणि घरी व्हायोलिनचे वर्ग घेत.. प्रभाकर जोग आसपास रेंगाळून संगीताचा आस्वाद घेतच मोठे झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी त्यांनी व्हायोलिनचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातील वाड्यांमधून त्यांनी सव्वा रुपया आणि नारळ या बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम केले. पुढे ते संगीत दिग्दर्शक [[सुधीर फडके]] यांचे साहाय्यक झाले. गीतरामायणाच्या सुमारे ५०० कार्यक्रमांना प्रभाकर जोग यांची साथ होती.
 
[[स्नेहल भाटकर]] यांच्याकडे जोग यांनी ’गुरुदेवदत्त’ या १९५१च्या चित्रपटात व्हायोलिनवादन केले. स्वरलिपी लेखनकलेत पारंगत असलेले प्रभाकर जोग त्यानंतर संगीतकार [[श्रीनिवास खळे]], [[दशरथ पुजारी]], [[हृदयनाथ मंगेहकर]], [[यशवंत देव]], [[वसंत पवार]], [[वसंत प्रभू]], [[राम कदम]] आणि [[यशवंत देव]] यांच्याबरोबर काम करू लागले.
 
प्रभाकर जोग यांनी मराठी चित्रपट, गामोफोन कंपन्या, आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्यासाठी संगीताच्या सुरावटी रचल्या आहेत. त्यांच्या व्हायोलिन वादनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका, कॅसेट्स आणि सीडीज आहेत. या सीडीजमध्ये ’गाणारे व्हायोलिन’ नावाच्या ६ आणि ’गाता रहे मेरा व्हायोलिन’ नावाच्या चार सीडीज आहेत. ’[https://itunes.apple.com/us/album/ganara-violin/id861789612 आयट्यून्स] नावाच्या संकेतस्थळावर त्यांच्या काही सुरावटी ऐकायला मिळतात.
 
==प्रभाकर जोग यांनी संगीत दिलेले मराठी चित्रपट (एकूण २२)==
* जावई माझा भला
 
==गाणारे व्हायोलिन==