"इयान फ्लेमिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
जेम्स बाँड हा नायक असलेल्या इंग्रजी चित्रपटांत “धिस इज बाँड... जेम्स बाँड!” हा हुकमी डायलॉग असे/ त्यानंतर विध्वंसाचा खेळ सुरू होतो. हा विध्वंस इमारतींचा, गाड्यांचा, विमानांचा, आणि हृदयांचा देखील असतो. जेम्स बाँड म्हणतो, “विधायक कामांशी माझे फार सख्य नाही.” ते बरोबरच आहे.. जेम्स बाँड हा हत्येचा परवाना घेऊन फिरणारा सर्वाधिक लोकप्रिय नायक आहे. त्याला 'सुपरहिरो' म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. आणि कोणत्याही बाँड-चाहत्याला, जेम्स बाँड हे एका लेखकाने निर्माण केलेले काल्पनिक पात्र आहे, यावर विश्वास ठेवायला आवडणार नाही.
 
जेम्स बाँडला नैतिकतेची चाड असून, खुनी व विषयासक्त कारवायांमधील तटस्थता झुगारून आत्मक्लेशाकडे झुकणारी अशी आत्मपरीक्षणाची क्षमता त्याच्याकडे आहे. इयान फ्लेमिंग स्कॉटिश वंशाचे होते, आणि त्यांच्या मनात, बाँडची स्वसुखलोलुपता, त्याची व्होडका मार्टिनी 'शेकन नॉट स्टर्ड', महागड्या मोर्लंडमोर्लन्ड स्पेशल सिगारेटची तलफ, परस्त्रियांशी भावनाहीन प्रणयाराधन, वेगवान गाड्यांचे वेड, या गोष्टींबद्दल अपराधीपणाची भावना होती. लोकांचे पोषाख, त्यांच्या शरीरावरील तीळ व व्रण, एखाद्याच्या बोटाच्या लांबीतील अनियमितपणा, एखाद्याची मान किंवा कवटीचा विचित्र आकार, या गोष्टींचे मनोरंजक लिखाणांमध्ये बहुधा न आढळणारे, विस्तृत व सबळ विवेचन त्यांच्या लिखाणात येते.
 
जेम्स बाँडच्याच बाबतीत बोलायचे झाले तर तो एक चिरंजीव नायक आहे, आणि त्याच्या थरारक कारवायांसाठी हे जगदेखील पुरेसे नाही.
ओळ २०:
 
==इयान फ्लेमिंगच्या कादंबर्‍यांची मराठी रूपांतरे==
* ऑक्टोपसी (अनुवाद : [[जयवंत दळवी]])
* ऑन हर मॅजेस्टीज‌ सीक्रेट सर्व्हिस (अनुवाद : अजित ठाकूर)
* कॅसिनो रॉयल (अनुवाद : [[सुभाष जोशी]])
* गोल्डफिंगर (अनुवाद : माधव कर्वे)
* डॉ. नो (अनुवाद : विजय देवधर)
* डायमंड्स फॉरएव्हर (अनुवाद : अशोक पाथरकर)
* थंडरबॉल (अनुवाद : जयंत कर्णिक)
* द मॅन विथ द गोल्डन गन (अनुवाद : देवदत्त केतकर)
* द स्पाय हू लव्ह्‌ड मी (अनुवाद : अजित ठाकूर)
* फॉर युअर आईज ओन्ली (अनुवाद : अनिल काळे)
* फ्रॉम रशिया विथ लव्ह (अनुवाद : विजय देवधर)
* मूनरेकर (अनुवाद : उदय नारकर)
* यू ओन्ली लिव्ह ट्वाड्स (अनुवाद : जयवंत चुनेकर)
* लिव्ह ॲन्डअॅन्ड लेट डाय (अनुवाद : अनिल काळे)