"कोण म्हणतो टक्का दिला?" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
 
त्यानंतर त्या घरात जे काही काही घडते ते या नाटकाच्या रूपाने लेखक संजय पवार यांनी प्रेक्षकांसमोर मांडले आहे.
 
एक कचर्‍या सोडला तर नाटकातील सर्व पात्रे उच्चवर्णीय आहेत आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. यात कचर्‍याचा दगडाचा देव आपल्या देव्हार्‍यात मांडायला विरोध करणार्‍या मिसेस आराध्ये आहेत. तुमच्या वरच्या अन्यायाचे पाढे आणखी किती काळ वाचत राहणार असा सवाल कचर्‍याला करणारा, वेगवेगळ्या संस्कृतीनिष्ठ मुद्द्यांवर त्याच्याशी हुज्जत घालणारा त्यांचा मुलगा सुदर्शन आहे. आपल्या घरात आणलेल्या आदिवासी पोराकडे अँटिक पीस म्हणून बघणार्‍या शेजारच्या घरातल्या मिसेस नाडकर्णी आहेत आणि त्याचवेळी संपूर्ण रॅशनल भूमिका स्वीकारून कचर्‍याच्या घरातल्या अस्तित्वाकडे बघणारे कमलाकर आराध्ये आणि त्यांची मुलगी सुकन्या हेही आहेत. या निमित्ताने वेगवेगळ्या आवरणाखाली आपल्या मनातली जातीयता लपवण्याचा प्रयत्‍न प्रत्येकजण कसा करत राहतो हे दिसते.
 
कोणी जोशी कुटुंब मागासवर्गीय माणसाला घरात आणावे लागू नये म्हणून आपण कुडमुडे जोशी असल्याचे सरकारला कळवते, तर मिसेस आराध्ये मागासवर्गीयांची यादी बघायला जाणार्‍या सुकन्याला यादीतून पुरस्कारप्राप्त दलित लेखकाचा मुलगा निवडायला सांगते. पण ती कचर्‍याला निवडते.
 
==नाटकाचे वैशिष्ट्य==
संजय पवारांचा थेटपणा व्यक्त करणारे तिखट संवाद हे या नाटकाचे बलस्थान आहे.
 
नाटकाच्या सुरुवातीच्या प्रयोगांत [[उपेंद्र लिमये]] या नटाने कचर्‍याची भूमिका केली होती.