"जे. मंजुला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जे.मंजुला (जन्म : नेल्लोर-आंध्र प्रदेश, इ.स. १९६२; हयात) या भारताच...
(काही फरक नाही)

२२:४५, १२ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

जे.मंजुला (जन्म : नेल्लोर-आंध्र प्रदेश, इ.स. १९६२; हयात) या भारताच्या संरक्षण दलातील संदेशवहन यंत्रणा अधिक सक्षम आणि सुरक्षित करण्यात ज्यांनी मोठा हातभार लावला अशा काही भारतीय वैज्ञानिकांपैकी एक आहेत.

जे.मंजुला यांचे वडील जे.श्रीरामुलू हे नेल्लोर जिल्हा शाळेचे मुख्याध्यापक होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर जे.मंजुला यांनी उस्मानिया विद्यापीठातून ‘इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन’ या शाखेतून अभियांत्रिकी पदवी मिळवली व काही काळ इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे काम केले.

मंजुला इ.स.१९८७ मध्ये डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेन्ट ऑर्गनायझेशन-‘डीआरडीओ’त रुजू झाल्या. हैदराबाद येथील डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स संशोधन प्रयोगशाळेत त्यांनी २६ वर्षे काम केले.

या २६ वर्षांत मंजुला यांनी देशाच्या संरक्षण दलासाठी जलद व सुरक्षित संदेश ग्रहण करणारी अत्याधुनिक यंत्रणा व त्यासाठी लागणारी उच्च क्षमता रेडिओ लहरी प्रणाली विकसित केली. याशिवाय संरक्षण दलासाठी आवश्यक अशी अनेक सॉफ्टवेअर त्यांनी विकसित केली आहेत.

जे.मंजुला यांचा ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम’ची रचना आणि विकास या क्षेत्रांत दांडगा अनुभव आहे. ‘डीएआरई’ विभागाच्या संचालकपदी असताना त्यांनी भारतीय हवाई दलात भारतीय बनावटीची ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणाली कशी वापरता येईल यावर काम करण्यास सुरुवात केली होती.

जे.मंजुला जुलै २०१४ मध्ये डिफेन्स एव्हिऑनिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट- डीएआरईच्या संचालक झाल्या. सप्टेंबर २०१५ मध्ये त्या संरक्षण संशोधन व विकास संस्था- डीआरडीओमधील इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन सिस्टिम्स विभागाच्या महासंचाालकही झाल्या. या पदांवर नेमणूक झालेल्या भारतातील त्या पहिल्याच महिला होत.