"आवर्तन - भारतीय संगीतातील स्थूलता आणि सूक्ष्मता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''आवर्तन-भारतीय संगीतातील स्थूलता आण‌ि सूक्ष्मता''' हे तबलावादक ...
(काही फरक नाही)

२३:११, १० सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

आवर्तन-भारतीय संगीतातील स्थूलता आण‌ि सूक्ष्मता हे तबलावादक सुरेश तळवलकर यांनी लिहिलेले पुस्तक, तबल्याचे मर्म उलगडून दाखवणारे एक मराठी पुस्तक आहे.

या पुस्तकात तळवलकरांनी तबलावादनाच्या कलेबरोबरच त्या वाद्यामागचे शास्त्रही उलगडून दाखवले आहे. तबल्याच्या प्रकृतीची, ताकदीची आणि व‌ैशिष्ट्यांची ओळख करून देण्याच्या निमित्ताने या पुस्तकात जागोजागी केलेली भाष्ये सामान्य रसिकाला या कलेच्या अंतरंगात डोकावण्याची संधी मिळवून देतात.

श्रेष्ठ तबलावादकांच्या शैलींचा योग्य तेथे उल्लेख करीत, चपखल उदाहरणे देत तबल्याचा सर्वांगीण वेध घेणारे हे पुस्तक त्यात वापरलेल्या अस्सल मराठी संकल्पनांमुळे, शब्दांमुळे आणि ओघवत्या शैलीमुळे वाचकांच्या मनाचा ठाव घेते.