"कांचन सोनटक्के" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २६:
==कांचन सोनटक्के यांची नाट्यकारकीर्द==
कांचनताईंनी २०१५ सालापर्यंत वीस हिंदी-मराठी नाटकांमधून भूमिका केल्या’. पंधरा नाटकांची वेशभूषा, प्रकाशयोजना केली.. "विशेष‘ मुलांसाठी ५० बालनाट्ये बसवली. त्यांचे रंगमंचीय, टीव्ही आणि रेडिओ या माध्यमांसाठी प्रयोग केले. ‘गोल गोल राणी,‘ ‘चू चू चू‘, ‘फुलराणी‘, ‘मजेत भूगोल शिकू या‘, ‘मंतरलेली मूर्ती‘, ‘मस्ती की पाठशाला‘, ‘रंगपांचालिक‘, ‘स्वामी विवेकानंद‘, ‘हाताची घडी तोंडावर बोट‘, ही त्यांची बालनाट्ये गाजली. ‘उमंग‘, ‘उडान‘ ‘जल्लोष‘, ‘संकल्प‘, या नावांनी त्यांनी उदयपूर, नागपूर, मुंबई, नवी मुंबई, सोलापूर येथ्ये घेतलेले बालनाट्य महोत्सव खूपच गाजले. या कार्यक्रमांतून केवळ नाटक नव्हे, तर अन्य कलाप्रकारांचीही जोपासना करण्यासाठी कांचनताईंनी प्रशिक्षण दिले.
 
==बालरंगभूमी==
महाराष्ट्रातल्या बालरंगभूमीला इ.स. २०१० नंतर मरगळ आली आहे. प्रेक्षक वर्गाने पाठ फिरवली आहे. ’विशेष‘ मुलांच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी, उत्साह बालरंगभूमीकडे खेचून आणण्यासाठी कोणते उपाय योजावेत, याचा कांचन सोनटक्क्यांनी बराच विचार केला आहे.
 
सोनटक्क्यांच्या मते, बालरंगभूमीसाठी बाल आणि मोठा प्रेक्षक खेचण्यासाठी त्या पद्धतीचे ’कल्चर‘ विकसित करावे लागणार आह. नाट्य परिषदेने बालनाट्य संमेलन घेऊन त्याची सुरुवात केली आहे. बालनाट्यांच्या प्रयोगासाठी सभागृहाचे भाडे किंवा जाहिराती यावर मोठा खर्च होतो. त्या तुलनेत प्रेक्षकवर्ग तुटपुंजा असतो. शाळाशाळांमधून बालनाट्यांचे प्रयोग करता येतील काय, याचाही विचार व्हायला पाहिजे, अस कांचन सोनटक्के यांना वाटते.
 
==कांचन सोनटक्के यांना मिळालेले सन्मान==
* नोव्हेंबर २०१५ मध्ये [[सोलापूर]]ला होणार्‍या अखिल भारतीय मराठी [[बालनाट्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद.
 
 
 
 
[[वर्ग:मराठी नाट्यसंमेलने]]