"कांचन सोनटक्के" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी
(चर्चा | योगदान)
ओळ २०:
 
कांचन सोनटक्के यांनी फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर "विशेष‘ मुलांसाठी नाट्यशिबिरे घेतली आहेत. या मुलांनी सादर केलेल्या नाटकांना नाट्यगृहे गर्दीने ओसंडून वाहत असल्याचा अनुभव अनेकदा आला आहे. ’विशेष‘ मुलांमधील आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी आणि त्यांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे व्यवहार करण्यासाठी कांचनताईंनी त्यांच्या सहकार्‍यांबरोबर घेतलेल्या कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरांचा खूप उपयोग झाला आहे.
 
==नाट्यशालेव्यतिरिक्त अन्य संस्थांतून प्रशिक्षण शिबिरे==
कांचन सोनटक्की याणी आपल्या ’नाट्यशाला‘ या संस्थेशिवाय "एनसीपीए‘, "इंडियन असोसिएशन फॉर प्री-प्रायमरी एज्युकेशन,‘ महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतिक खाते, गोवा कला अकादमी, दक्षिण-मध्य आणि पश्‍चिम सांस्कृतिक केंद्र अशा अनेक संस्थांसाठी त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रम घेतले, शिबिरे घेतली.
 
==कांचन सोनटक्के यांची नाट्यकारकीर्द==
कांचनताईंनी २०१५ सालापर्यंत वीस हिंदी-मराठी नाटकांमधून भूमिका केल्या’. पंधरा नाटकांची वेशभूषा, प्रकाशयोजना केली.. "विशेष‘ मुलांसाठी ५० बालनाट्ये बसवली. त्यांचे रंगमंचीय, टीव्ही आणि रेडिओ या माध्यमांसाठी प्रयोग केले. ‘गोल गोल राणी,‘ ‘चू चू चू‘, ‘फुलराणी‘, ‘मजेत भूगोल शिकू या‘, ‘मंतरलेली मूर्ती‘, ‘मस्ती की पाठशाला‘, ‘रंगपांचालिक‘, ‘स्वामी विवेकानंद‘, ‘हाताची घडी तोंडावर बोट‘, ही त्यांची बालनाट्ये गाजली. ‘उमंग‘, ‘उडान‘ ‘जल्लोष‘, ‘संकल्प‘, या नावांनी त्यांनी उदयपूर, नागपूर, मुंबई, नवी मुंबई, सोलापूर येथ्ये घेतलेले बालनाट्य महोत्सव खूपच गाजले. या कार्यक्रमांतून केवळ नाटक नव्हे, तर अन्य कलाप्रकारांचीही जोपासना करण्यासाठी कांचनताईंनी प्रशिक्षण दिले.