"वरंध घाट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुण्याहून भोर मार्गे महाडकडे गेलेल्या राज्यमार्गावर वरंध घाट (क...
(काही फरक नाही)

१६:५०, २२ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

पुण्याहून भोर मार्गे महाडकडे गेलेल्या राज्यमार्गावर वरंध घाट (किंवा वरंधा घाट) नावाचा २०-२५ किलोमीट्र लांबीचा डोंगरी रस्ता येतो. हा घाट सहय़ाद्रीच्या उभ्या धारेवर असलेल्या कावळ्या किल्ल्याला उभे दुभंगून देशावरून कोकणात उतरतो. घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, गर्द झाडीत समर्थ रामदासस्वामींची शिवथरघळ आहे.

घाटाच्या सुरुवातीला भोर तालुक्यातले हिरडोशी गाव आहे, मध्यात वाघजाई मंदिर आहे व उताराच्या शेवटाला कोकणातले बिरवाडी (माझेरी) हे गाव आहे. तेथून कोकणात अन्यत्र जाता तेते.

वाघजाई समोरचा एक भलामोठा डोंगर तर एखाद्या अजस्र शिवलिंगाच्या आकाराचा आहे. धो-धो पाऊस कोसळू लागला, की त्याच्या चहुअंगावरून असंख्य धबधबे कोसळत असतात.

वाघजाईच्या पुढे लगेच एका खिंडीतून घाट डावीकडे वळतो. या खिंडीच्या दोन्ही अंगांचे डोंगर म्हणजे एक दुर्गच आहे. कावळ्या ऊर्फ मनमोहनगड असे त्याचे नाव. या गडाच्या वाघजाईकडील बाजूच्या डोंगरामध्ये नऊ खोदीव टाक्या आहेत. तर दुसर्‍या बाजूस अशाच काही टाक्या व शिबंदीच्या घरट्यांचेे अवशेष दिसतात. इतिहासात फारसा परिचित नसलेल्या या गडावर प्राचीन काळापासून वाहत्या असलेल्या या घाटवाटेवर लक्ष ठेवण्याचे काम होते. अशी ही घाटवाट पुढे ब्रिटिशांनी १८५७ मध्ये सव्वा लाख रुपये खर्चून पक्की केली.


सह्याद्रीतले घाटरस्ते