"नग्नसत्य: बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३८:
 
[[मुक्ता मनोहर]] यांनी भारतातील बलात्काराच्या घडलेल्या घटनांनवर अभ्यास केलेला आहे. त्यांतील अनेक केसेसचा आढावा घेऊन अशा केसेसला राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक पातळीवर कसा न्याय दिला जातो याची सविस्तरपणे मांडणी केली आहे. बलात्कार आणि त्यातून झालेल्या खुनाच्या घटनांना, न्यायव्यवस्था, जात, परंपरांना आणि स्वतः स्त्रियांना अशा घटनांसाठी कारणीभूत ठरवण्याचा प्रयत्‍न समाज पातळीवर सुरू असतो, हे मुक्ता मनोहर लक्षात आणून देतात. पुरुष हा स्वतःला कसा निर्गुण, निराकार समजून मी फक्त एक कृती आहे असे सांगतो हे त्या लक्षात आणून देतात.<ref name="प्रगती_बाणखेले"/> बलात्काराच्या केसेस जेव्हा न्याय मागण्यांसाठी कोर्टाची पायरी चढतात, तेव्हा आरोपीचे वकील फिर्यादी स्त्रीची कशा प्रकारे खिल्ली उडवतात आणि तिला वेश्या समजून ही घटना तिच्या सहमतीने घडलेली आहे, असा दावा करतात.
 
भारतातल्या बलात्कारांविषयी बोलता बोलता जगाच्या बाजारपेठेतला स्त्रियांचा बाजारही लेखिकेने उभा केला आहे. लेखिकेच्या मतानुसार युद्ध हा तर बलात्काराचा मोठा भाऊ. बलात्कार आणि वंशविच्छेदनाचे तर जवळचे नाते आहे. मानवी इतिहासात युद्धांसोबत बलात्कारही नोंदवले गेलेत. जेत्यांचे ते शस्त्र. शत्रूपक्षाला तुम्ही तुमच्या स्त्रियांनाही सांभाळू शकत नाही हे दाखवत त्यांचे मनोधैर्य खचवण्यासाठी शत्रूंच्या बायकांना पळवून त्यांच्यावर बलात्कार करणे हे अगदी सगळ्या काळात दिसते. तंत्रज्ञानाच्या प्रभावाविषयी सुद्धा लेखिकेने मते व्यक्त केली आहेत.<ref name="प्रगती_बाणखेले"/>
 
==टीका==