"प्र.ल. मयेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
प्र. ल. मयेकर यांची 'मा अस साबरीन', 'अथ मनुस जगन हं', 'आद्यंत इतिहास' असल्या फँटसीच्या अंगाने जाणारी, काल्पनिक प्रदेशातील रुपकात्मक नाटके राज्य नाट्य स्पर्धांमध्ये गाजली. या नाटकांच्या रचना आणि त्यातील भाषेचा डौल हा खास 'मयेकरी' होता.
 
वसंत कानेटकर यांची नाटके करणार्‍या 'चंदलेखा' या मोहन वाघ यांच्या संस्थेने या नाटककारास अचूक हेरले, आणि त्यांची नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आणायला सुरुवात केली. पुढे त्यांची मालवणी बोलीतील नाटके मच्छिंद कांबळी यांच्या 'भद्रकाली' संस्थेने रंगभूमीवर आणली. त्यांच्या ’पांडगा इलो रे बाबा इलो’चा प्रयोग [[इंदूर]] येथे ६-८-२०१५ला झाला होता, तो अतिशय गाजला..
 
कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, रहस्यप्रधान, थरारक अशी सर्वप्रकारची नाटके मयेकरांनी लिहिली. १९८०नंतर व्यावसायिक रंगभूमीला मरगळ आली होती. मुंबईतील गिरणी संप आणि समाजातील अस्थिर वातावरण यामुळे प्रेक्षक नाट्यगृहाकडे येईनासे झाले होते. अशा काळात मयेकरांनी दिलेल्या नाटकांमुळे व्यावसायिक रंगभूमी आपला तोल सावरू शकली.